mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यात जयवंत बोधले महाराजांची पाच दिवसीय धनश्री प्रवचनमालेला सुरुवात; मानसिक प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आजच भेट द्या

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 16, 2022
in आरोग्य, मंगळवेढा, सोलापूर
मंगळवेढ्यात जयवंत बोधले महाराजांची पाच दिवसीय धनश्री प्रवचनमालेला सुरुवात; मानसिक प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आजच भेट द्या

टीम मंगळवेढा टाईम्स ।

आपली मानसिक प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी परमार्थाचे साधन असणार्‍या प्रवचनमाला सारखे प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करणे हे मनुष्याचे जीवनाचे कर्म,ज्ञान,भक्ति हे त्रिवेणी संगम आहे.

हा त्रिवेणी संगम गेल्या चार वर्षांपासून संतनगरी म्हणून ओळखले जाणार्‍या मंगळवेढा येथे स्व.सौ.लक्ष्मीबाई (नीलाई) बाजीराव कांळुगे यांचे स्मरणार्थ धनश्री परिवाचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे व प्रा.शोभाताई काळुंगे सुरू ठेवला आहे.

असे प्रतिपादन वारकरी संप्रदायातील संतश्रेष्ठ मानकोजी महाराज बोधले यांचे वंशज ह.भ.प. अ‍ॅड.जयवंत बोधले यांनी केले.

मंगळवेढा येथील रजपूत लॉन्स येथे स्व. सौ. लक्ष्मीबाई (नीलाई) बाजीराव कांळुगे यांचे स्मरणार्थ आयोजीत करण्यात आलेल्या धनश्री प्रवचनमाला या पाच दिवसीय प्रवचन मालेत पहिल्या दिवशी विवेचन करताना बोधले महाराज म्हणाले,

भक्ती हे एक असे साधन आहे की जे फल प्राप्ती नंतर ही शिल्लक राहते म्हणूनच ज्ञानपूर्व भक्ती व ज्ञानोत्तर भक्ती असा विचार गीतेमध्ये श्री कृष्णाने अर्जुनाला सांगितलेला आहे . भक्ती शब्दाला योग हा शब्द जोडला आहे.

भक्तीने परमात्म्याला जोडणे म्हणजे भक्तियोग प्रत्येकाचे साध्य हे एक असते परंतु त्यासाठी साधने अनेक असतात. ज्याप्रमाणे मडययाला मातीचा कंटाळा नसतो, कपड्याला तंतूंचा कंटाळा नसतो त्याचप्रमाणे माणसाने कर्माचा कंटाळा करु नये. ज्ञानापेक्षा, कर्मापेक्षा, योगापेक्षा भक्ती श्रेष्ठ होय भगवंतप्राप्ती म्हणजे भक्ती आणि भक्ती ही भगवंताच्या जवळची वाट आहे.

रामायणाचा विचार केला असता राम, लक्ष्मण व भरत या पात्रांचा सातत्याने उल्लेख होतो. मात्र पडद्याआड असलेला व अहंकाररूपी शत्रूचा नाश करणारा असा शत्रुघ्न रामाचा दास, आज्ञाधारक तसेच कोणत्याही गोष्टीचे मूळ शोधणारा वा कोणतीही अपेक्षा नसणारा असा तो शत्रुघ्न होता.

रामायणामध्ये चार बंधूंपैकी शत्रुघ्नचा फारसा विचार झाला नाहीख्र ज्यावेळी राम- लक्ष्मण चौदा वर्षे वनवासात होते.त्यावेळेस भरत हादेखील चौदा वर्षे अयोध्येशेजारील नंदीग्राममध्ये होता.अशा प्रसंगामध्ये 14 वर्षे अयोध्येचे राज्य ज्यांनी सांभाळले असा तो शत्रुघ्न होता.

वनवासाला गेलेल्या राम-लक्ष्मणाला राज्यगादीची अपेक्षा नळहती. त्याचप्रमाणे नंदीग्राममध्ये राहणार्या भरतला देखील नव्हती. परंतु राज्यगादी समोर दिसत असताना त्याची अपेक्षा नसलेला शत्रुघ्न होता असे महाराजांनी स्पष्ट केले.

या शत्रुघ्नचे विविध पैलू उघडून दाखवताना महाराज म्हणतात की, शत्रुघ्नने जो अहंकार जिंकला होता तसेच स्वत:चे मी पण त्याने कधीही रामायणात मिरवले नाही.

म्हणून शत्रुघ्नचा विचार हा रामाच्या दासाचा दास म्हणजे राम-भरत-शत्रुघ्न असा होतो. नावातच शत्रुघ्न असलेला तो आज्ञाधारक होता. खर्‍या अर्थाने भक्तीयोग जाणून घेण्यासाठी त्याची व्याख्या समजली पाहिजे. याबाबत दुसर्‍या सत्रात विवेचन होणार आहे.

धनश्री परिवाराचे प्रमुख प्रा.शिवाजीराव काळुंगे, यावेळी मनोहर कलुबर्मे, प्रा.शोभाताई काळुंगे, डॉ. राजलक्ष्मी काळुंगे – गायकवाड, युवराज गडदे, प्रभाकर कलुबर्मे, बसवराज मोगले, दत्तात्रय नागणे, प्रकाश काळुंगे, राकेश गायकवाड, धनश्री महिला पतसंस्थेच्या सरव्यवस्थापिका सुनिता सावंत, धनश्री मल्टीस्टेटचे सरव्यवस्थापक रमेश फडतरे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: धनश्री

संबंधित बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
Next Post
खळबळ! दारूच्या नशेत गळपास घेऊन आत्महत्या; मंगळवेढा तालुक्यातील घटना

धक्कादायक! विषारी साप चावल्‍याने सहावर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..