टीम मंगळवेढा टाईम्स ।
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कायम सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक उपक्रमात पुढाकार घेणारे विठ्ठल प्रतिष्ठान यांच्यावतीने
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक, पंढरपूर येथे विठ्ठल प्रतिष्ठान युवाशक्ती भव्य दहीहंडी उत्सव आज दिनांक १० सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे.
विठ्ठल प्रतिष्ठानच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार, अभिनेते अमोल कोल्हे यांच्या प्रमुख भूमिकेत शिवपुत्र छत्रपती संभाजी महानाट्याचे सलग पाच दिवस महानाट्य साकारण्यात आले होते.
तसेच पंढरपूरमधील महिलांना खुलं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी क्रांती नाना मळेगावकर यांच्या माध्यमातून खेळ पैठणीचा अतिशय सुंदर उपक्रम घेण्यात आला होता.
तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महागायक आदर्श शिंदे यांच्या कलेतून शिंदेशाही बाणा पंढरपूर येथे मोठ्या उत्साहात घेण्यात आला होता.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तीन दिवसीय व्याख्यानमाला ठेवण्यात आली होती आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांची व्याख्यानमाला ठेवण्यात आली होती.
समाजोपयोगी म्हणून मध्यंतरी झालेल्या रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडी येथे पूरग्रस्तांना अत्यावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले होते..अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून विठ्ठल प्रतिष्ठान हे विविध सामाजिक तसेच सांस्कृतिक उपक्रम घेत पंढरपूरकरांच्या मनामध्ये एक चांगलीच जागा व आवड निर्माण करत आहेत.
तमाम पंढरपूरकर वासीय आणि बालगोपाल यांनी आज दिनांक १० सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक,पंढरपूर येथे सर्वांनी सायंकाळी ६ वाजता या भव्यदिव्य दहीहंडी उत्सवात सहभागी होण्याचे श्री विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी आवाहन केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज