मंगळवेढा टाईम्स न्यूज।
वीरश्री महिला ग्रामीण बिगरशेती पतसंस्था या बँकेमुळे मंगळवेढ्यामधील नागरिकांच्या आर्थिक प्रगतीस आणि सामाजिक विकासास नवे बळ प्राप्त होईल असे प्रतिपादन मंगळवेढा नगरपरिषदेच्या नूतन नगराध्यक्षा सुनंदा आवताडे यांनी व्यक्त केले आहे.
वीरश्री ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, मंगळवेढा या संस्थेचा भव्य उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी उद्योजक प्रसाद कुलकर्णी होते.

संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ भुसे बोलताना म्हणाले की, मंगळवेढ्यातील राष्ट्रीयकृत बँकांबरोबर आम्ही मोठ्या ताकतीने बाजारपेठ मध्ये उतरलो आहोत.

छोटे-मोठे उद्योजक यांना पाठबळ देण्यासाठी शेतकरी बांधवांना मदत करण्यासाठी व महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही कार्यरत राहणार आहोत.

येणाऱ्या काळामध्ये वीरश्री महिला पतसंस्था ही सर्वसामान्य नागरिकांसाठी पूर्णपणे तत्पर सेवा देण्यासाठी असल्याचे भुसे यांनी सांगितले.

या कार्यक्रमास अॅड. नंदकुमार पवार, प्रकाश गायकवाड, सोमनाथ आवताडे, अरुणा माळी, प्रदीप खांडेकर, पांडुरंग भाकरे, प्रमोद सावंजी, भीमराव मोरे, उमाकांत कनशेट्टी, मारुती वाकडे, प्रा. सचिन इंगळे, प्रा. विनायक कलुबर्मे, सतिश दत्तु,

राजाभाऊ चेळेकर, सत्यजित सुरवसे, समाधान फुगारे, नवनाथ दिवसे, तुकाराम मेटकरी, श्रीपाद शिंदे, राजेंद्र हजारे, कवी लक्ष्मण हेंबाडे,

सचिन हेंबाडे तसेच सर्व संचालक मंडळ, कर्मचारी पदाधिकारी आदी मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मिसाळ यांनी केले तर आभार मदन पाटील यांनी मानले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













