टीम मंगळवेढा टाईम्स।
आरोग्य पूरक समाज स्वास्थासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने हाती घेण्यात आलेली आयुष्यमान भारत अभियान ही काळाची गरज निर्माण झाल्याचे प्रतिपादन पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत आयुष्यमान भव: अभियान साप्ताहिक आरोग्य मेळावा व आरोग्य तपासणी या मोहिमेचा शुभारंभ
खा.डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी शिवाचार्य यांच्या हस्ते व आमदार समाधान आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे संपन्न झाले त्याप्रसंगी आमदार आवताडे हे बोलत होते.
सदर कार्यक्रमा अंतर्गत सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये आरोग्य विभागामार्फत लोकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
पुढे बोलताना आ आवताडे म्हणाले की, भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकार यांच्यामार्फत देशातील नागरिकांसाठी आरोग्य सक्षमीकरणासाठी लोककल्याणकारी योजना राबवल्या जातात.
देशभरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी केंद्र सरकारमार्फत आयुष्यमान भारत योजने अंतर्गत गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील नागरिकांना ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत केले जातात. देशातील सक्षम आरोग्य सुविधेसाठी हे अभियान दिवसेंदिवस लोकाभिमुख पद्धतीने नागरिकांच्या व रुग्णांच्या मदतीला उपयोगी पडत आहे
देशातील अनेक नागरिकांना
अर्थिक बाजू कमकुवत असल्या कारणास्तव महागडे उपचार करणे परवडणारे नसल्यामुळे शासनाने या लोकाभिमुख उपक्रमाचा शुभारंभ केला आहे.
धावपळीच्या या दैनंदिन जीवनामध्ये आरोग्याकडे पुरेसे लक्ष न दिल्याने अनेक आजरांना आमंत्रण मिळत आहे. त्यामुळे कोणत्याही आजाराला बळी न पडण्यासाठी संतुलित व सकस आहार आणि दैनंदिन दिनचर्या यांचा योग्य तो समतोल साधण्यासाठी व आरोग्य हितकारक मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अशा कार्यक्रमांची नितांत गरज असल्याचेही आमदार आवताडे यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमासाठी दत्तात्रय जमदाडे, भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, विधानसभा अध्यक्ष राजेंद्र सुरवसे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष मोगले, माजी जि.प. सदस्य नामदेव जानकर, माजी संचालक विजय माने, न.पा. प्राथ. शिक्षण मंडळ सदस्य दिगंबर यादव,
कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे संचालक जगन्नाथ रेवे, ग्रा पं. सदस्य संजय माळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ बाबासाहेब जानकर, संपादक विक्रांत पंडीत, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव, अभिजित लोखंडे, खंडू खंदारे, शहराध्यक्ष सुशांत हजारे, आनंद मुढे आदी मान्यवर व इतर बहुसंख्येने उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज