टीम मंगळवेढा टाईम्स ।
2000 रुपयांच्या नोटा तुमच्याही असतील तर ही बातमी नक्की वाचा. 19 मे रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घोषणा केली होती. 2000 रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या घोषणेबरोबरच भारतीय रिझर्व्ह बँकेने त्या नोटा बँका आणि आरबीआयच्या 19 प्रादेशिक कार्यालयांमध्ये जमा करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी आज 30 सप्टेंबरची अंतिम मुदत दिली आहे.
म्हणून आज शेवटचा दिवस आहे. आज 2000 रुपयांच्या नोटा बदलल्या किंवा जमा केल्या नाहीत तर तुमच्या समस्या आणखी वाढू शकतात.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातुन आत्तापर्यंत 273 कोटी 64 लाख 30 हजार रुपये ( 13 लाख 18 हजार 215 नोटा) बँकांमध्ये जमा झाले आहेत.
अद्याप इतक्या नोटा बाकी
रिझर्व्ह बँकेने 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. RBI ने दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्च 2023 पर्यंत 2000 रुपयांच्या 3.62 लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या. ज्या 19 मे 2023 रोजी 3.56 लाख कोटी रुपयांवर आल्या होत्या. गेल्यावेळी,
1 सप्टेंबर 2023 रोजी, RBI ने नोटा परत करण्याबाबत डेटा जारी केला होता, त्यानुसार 3.32 लाख कोटी रुपयांच्या 2000 च्या नोटा बँकिंग सिस्टममध्ये परत आल्या होत्या. म्हणजेच चलनात असलेल्या एकूण नोटांपैकी 93 टक्के नोटा बँकिंग व्यवस्थेत परत आल्या आहेत. 2000 रुपयांच्या 7 टक्के म्हणजेच 24,000 कोटी रुपयांच्या नोटा अद्याप परत करायच्या आहेत.
.. म्हणून घेतला निर्णय
2000 रुपये मूल्याची नोट नोव्हेंबर 2016 मध्ये जारी करण्यात आली. त्या वेळी चलनात असलेल्या सर्व 500 रुपये आणि 1000 रुपयांच्या नोटा एका झटक्यात चलनातून रद्द करण्यात आल्या होत्या. त्यावेळी बाजारातील चलनाची मागणी पूर्ण करण्यासाठी 2000 रुपयांची नोट जारी करण्यात आली होती.
सामान्य व्यवहारांसाठी दोन हजार रुपयांची नोट वापरली जात नसल्याची बाब समोर आली होती. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या “क्लीन नोट पॉलिसी” च्या अनुषंगाने, 2000 रुपये मूल्याच्या बँक नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज