टीम मंगळवेढा टाईम्स |
माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात धैर्यशील मोहिते पाटील यांच्या तुतारीची जोरदार हवा सुरू असून मोहिते पाटलांसाठी विरोधी गट एकत्र आले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
फलटणच्या खासदाराने आतापर्यंत आमच्यासाठी कोणतीच मदत मिळवून दिली नाही, शिवाय भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी काही सुद्धा केले नाही हा राग माढा मतदारसंघातील सर्व मतदार बोलून दाखवत आहेत.
मोहिते पाटलांचे विरोधक देखील धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करण्यासाठी एकत्र आले आहेत.
मोहिते पाटील यांनी आतापर्यंत चांगल्या पद्धतीच्या राजकारणासोबत समाजकारण केले असून सोलापूर जिल्हा व परिसरात केवळ मोहिते पाटील यांच्यामुळेच विकास झाला असल्याचे त्यांचे विरोधकच बोलून दाखवत आहेत.
शरद पवार यांच्यासोबत मोहिते पाटील कुटुंबीयांनी शेतकऱ्यांना भरभरून मदत केली आहे. आमच्या परिसरातील व हक्काचा खासदार म्हणून धैर्यशील मोहिते पाटील यांना आम्ही गट तट विसरून पाठिंबा दिला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
गोरगरीब शेतकऱ्यांचे व सर्वसामान्यांचा विकास होण्यासाठी शरद पवार यांच्या सोबत धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडून देणार आहोत.
विजयसिंह मोहिते पाटील यांची जिल्ह्यावर मोठी पकड आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात आमच्या मतदारसंघांमध्ये सर्वतोपरी मदत केली आहे त्यामुळे आमच्या परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास झाले असल्याचे देखील गावकऱ्यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज