टीम मंगळवेढा टाईम्स ।
पतीला व्याजाने दिलेल्या पैशात जमीन खरेदी देऊनही आणखी पैसे तुमच्याकडे फिरतात असा तगादा लावत तुमच्यावर अफरातफरीचा व ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करू अशी धमकी दिल्याने पतीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना दि.29 ऑगष्ट रोजी घडली होती.
या बाबत मोहोळ पोलिसात पती-पत्नी विरोधात आत्महतेस प्रवृत्त करणे व सावकारी करणे या अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
नितीन भास्कर आतकरे असे आत्महत्या केलेल्या चे नाव आहे. तर रामचंद्र धोंडीबा चंदनशिवे व रोहिणी रामचंद्र चंदनशिवे दोघे रा.इसबावी ता पंढरपूर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
मोहोळ पोलिसां कडून मिळालेल्या माहिती नुसार, मृत नितीन आतकरे यांनी चंदनशिवे पती-पत्नीकडून काही पैसे व्याजाने घेतले होते. त्या पैशासाठी ते पती-पत्नी नेहमी माझ्या पतीला त्रास देत होते. मृत नितीन आतकरे हे एका पेट्रोल पंपावर व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते.
पैसे परत न केल्यास पंपावर अफरातफर केली म्हणून व अॅट्रासिटी चा गुन्हा दाखल करू अशी वारंवार धमकी देत होते. तुम्हाला यातून सुटावयाचे असेल तर तुमच्या नावावरील जमीन मला खरेदी द्या असा तगादा चंदनशिवे पती-पत्नीने लावला होता. आतकरे यांनी ता 23 ऑगष्ट रोजी जमीन ही खरेदी करून दिली.
जमीन खरेदी देऊनही आणखी पैसे तुमच्याकडे फिरतात त्यामुळे तुमच्या नावावर असलेली आणखी जमीन खरेदी द्या, असा तगादा लावल्याने 29 ऑगस्ट रोजी नितीन आतकरे यांनी सकाळी साडेसात वाजण्यापूर्वी सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोठारी पाईप या कंपनी जवळ विष प्राशन करून आत्महत्या केली.
पतीच्या आत्महत्येस चंदनशिवे पती-पत्नी हेच जबाबदार असल्याची फिर्याद मृत नितीन आतकरे यांची पत्नी अस्मिता आतकरे रा मोहोळ यांनी मोहोळ पोलिसात दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक झालटे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज