mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खळबळजनक : लग्नास नकार ; भाच्याने केले मामाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
खळबळजनक : लग्नास नकार ; भाच्याने केले मामाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण

टीम मंगळवेढा टाईम्स । सख्ख्या मामाच्या अल्पवयीन मुलीने लग्नाला नकार दिल्यामुळे तिचे राहत्या घरातून अपहरण करून बळजबरीने लग्न करण्याच्या उद्देशाने ताब्यात ठेवल्याप्रकरणी कुर्डूवाडी पोलिसांत पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दाखल केली आहे. यावरून चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. भाच्यासह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, एक आरोपी फरार आहे. ही घटना लव्हे, (ता. माढा येथे घडली आहे.

कुर्डूवाडी पोलिसांत तानाजी मधुकर शेंबडे, अभिजित मधुकर शेंबडे दोघे बंधू (रा. माळशिरस) व त्यांना मदत करणारे त्यांचे नातेवाईक ज्ञानेश्‍वर पांडुरंग गोफणे (रा. महादेववाडी), विकास चोपडे (रा.कव्हे, ता. माढा) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तानाजी शेंबडे यांचे मामा लव्हे येथे राहतात. तानाजीने मामाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाची अनेक वेळा मागणी घालूनही मामाने लग्नाला नकार दिला होता. मुलीचाही या लग्‍नास विरोध होता.

दरम्यान, मुलीच्या लग्नासाठी माढा तालुक्यातील एका गावामध्ये स्थळ पाहण्यासाठी पीडित मुलीचे वडील गेल्याची कुणकुण माळशिरस येथील भाच्याला लागली होती. त्यामुळे मुलीचे घरातून अपहरण करुन लग्न करण्याची योजना त्याने आखली. तानाजी शेंबडे व त्याचा भाऊ अभिजित कुर्डूवाडी येथे आले. मुलीचे अपहरण करण्यासाठी या दोघांनी माढा तालुक्यातील महादेववाडी येथील त्यांचे नातेवाईक ज्ञानेश्‍वर गोफणे यास चारचाकी गाडी भाड्याने आणण्यास सांगितले.

त्यानुसार ज्ञानेश्‍वर यांनी कव्हे येथील विकास चोपडे यांची चारचाकी गाडी (क्र. एम.एच. 45- 8659) आणली. यातून चौघे लव्हे येथील मामाच्या वस्तीवर गेले. घरी पीडित मुलगी व तिचा लहान भाऊ दोघेच होते. तानाजीने आल्याबरोबर मामाच्या लहान मुलाला मोबाईल चार्जिंग करण्यासाठी चार्जर आणायला सांगितले. मुलगा आतल्या खोलीत चार्जर आणण्यासाठी गेला, तेव्हा बाहेरून कडी लावून दरवाजा बंद केला. तानाजी व अभिजित यांनी मामाच्या मुलीला गाडीत बसण्यास सांगितले, परंतु मुलीने गाडीत बसण्यास नकार दिला. त्यानंतर या दोघांनी पीडित मुलीला ओढत आणून गाडीत बसविले.

आरडाओरडा ऐकून शेजारी शेतात काम करणारा एक व्यक्‍ती तिथे आला. त्यालाही ढकलून देऊन खाली पाडले व गाडीत बसून ते निघून गेले. आरोपीच्या नावानिशी पोलिसांत फिर्याद दाखल होताच पोलिसांचे एक पथक माळशिरस येथे गेले. परंतु याबाबत मुलाच्या आई-वडिलांनी व नातेवाईकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. कुर्डूवाडी पोलिसांत साक्ष देण्याची सूचना करून हे पथक टेंभुर्णी येथे आले.

तक्रारदाराच्या सूचनेनुसार बेंबळे येथे तानाजीच्या नातेवाईकाकडे गेले. तेथेही मुलीचा शोध लागला नाही. अपहरणकर्त्यांनी मुलीला उसाच्या फडात मध्यभागी नेऊन ठेवले होते. पोलिस उसामध्ये मुलीचा शोध घेण्यासाठीही गेले. परंतु पोलिसांना पाहताच अपहरणकर्त्यांनी मुलीचे तोंड दाबून उसामध्ये दडवून ठेवले होते.

पोलिसांनी दिलेल्या धमकीनंतर बेंबळे येथील नातेवाईकांनी तानाजीला त्या पळवून आणलेल्या मुलीला घेऊन जाण्यास सांगितले. त्यानुसार तानाजी पहाटेच त्या मुलीला घेऊन माळशिरस या आपल्या गावी गेला. माळशिरस येथून याबाबतची खबर पोलिसांना मिळताच पोलिसांनी पीडित मुलीसह अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतले. आरोपींना मदत करणारा गाडीचालक विकास चोपडे अद्याप फरार आहे

.

अपहरणकर्त्यांनी मुलीला उसाच्या फडात लपविले


अपहरणकर्त्यांनी मुलीला आपल्या नातेवाइकांच्या गावात नेले आणि उसाच्या शेतात लपवून ठेवले. पोलिसांनी उसाच्या शेतातही शोध घेतला मात्र अपहरणकर्त्याने तिचे तोंड दाबून धरल्यामुळे तिचा शोध लागला नाही. त्याच्या नातेवाईकांना पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्यांनी अपहरणकर्त्याला मुलीला गावातून घेऊन निघून जाण्यास सांगितले. त्यामुळे गावी परत गेल्याने अपहरणकर्ते पोलिसांच्या तावडीत सापडले.

Uncle’s daughter abducted for refusing to marry madha kurdawadi

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: CrimeSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
सोलापूरकरांना दिलासा, दिवसभरात ग्रामीणमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही

सोलापूरकरांना दिलासा, दिवसभरात ग्रामीणमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट! बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशाचे ४३ हजार लांबवले; मंगळवेढा बसस्थानकावरील CCTV कॅमेरे पडले बिनकामी

August 1, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

आषाढी एकादशीला ३३ लाखांची तुफान गर्दी, तरीही एकही चोरी नाही; सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; SP अतुल कुलकर्णी यांचे ‘स्मार्ट’ नियोजन

August 1, 2026
गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

July 31, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

राजकीय पार्श्वभूमी आहे म्हणून सूट मिळणार नाही! मंगळवेढा न्यायालयात आरोपीला ३ वर्षांची ठोकली शिक्षा

July 31, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खपवून घेणार नाही! एफडीएचा शाळांना शेवटचा अल्टीमेटम; शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विकल्यास थेट कारवाई; तुकाराम मुंढेंची शाळांवर थेट धाड

July 30, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा