टीम मंगळवेढा टाईम्स ।
खासगी सावकाराकडून कुरियर चालकाने दरमहा १० टक्के व्याजाने घेतलेल्या 2 लाख रुपयेच्या पोटी तब्बल ३२ लाख ८२ हजार ७० रुपये व्याजासह परत देऊनही आणखी पैशांची मागणी करीत होते.
याप्रकरणी खासगी सावकारासह सहा जणांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत कुरियर चालक पांडुरंग मुखींदा आमले ( रा . जवळा ) यांनी मंगळवार २ ऑगस्ट रोजी फिर्याद दिली.
खासगी सावकार महेश औदुंबर गायकवाड, त्याची पत्नी सारिका महेश गायकवाड ( दोघेही रा.रुक्मिणी नगर , पंढरपूर ) , रामचंद्र पाटोळे , अमोल बाळासाहेब जाधव ( रा . यांच्यासह इतर दोन इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
जवळा येथील पांडुरंग आमले यांचा मुलगा सचिन आमले यांनी सन २०१५ ते २०१९ पर्यंत पंढरपूर येथील सांगोला रोडवर तिरुपती व मारुती कुरिअर कंपनीच्या शाखा चालवण्यासाठी घेतल्या होत्या.
यादरम्यान सचिन याची पंढरपूर येथील महेश गायकवाड यांच्याशी मैत्री झाली. त्यांने कुरिअर कंपनीचे कामकाज वाढण्यासाठी जुलै २०१६ मध्ये त्याच्याकडून दरमहा १० टक्के व्याजाने सुमारे २ लाख रुपये घेतले होते.
पैसे घेतल्यापासून ते २०१८ पर्यंत सचिनने महेश गायकवाड यास ५ लाख असल्याचे ५० हजार रुपये व्याजासह परत केले. तरीही त्याने आणखी पैशांची मागणी करू लागला.
नोकरी वाचवण्यासाठी पांडुरंग आमले यांनी आज अखेरपर्यंत महेश गायकवाड यांच्या खात्यावर १७ लाख ५ हजार रुपये, पत्नी सारिका हिच्या खात्यावर २ लाख २२ हजार ७०० रुपये ,
रामचंद्र पाटोळे याच्या खात्यावर ३ लाख २५ हजार रुपये तसेच १० लाख ३० हजार रुपये रोख असे एकूण ३२ लाख ८२ हजार ७०० रुपये देऊनही आणखी पैशांची मागणी करीत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
वडिलांना नोकरी घालविण्याची धमकी
सचिनचे वडील पांडुरंग आमले नोकरी करीत असलेल्या वेंगुर्ला येथे जाऊन वरील सर्व हकिकत सांगून १० लाख रुपये व्याज व मुद्दल अशी त्यांने मागणी केली. तुम्ही जर तुमच्या मुलाचे रक्कम परत नाही दिली तर मी वकिलाच्या डोक्याने तुमची नोकरी घालवू तुमच्या मुलाला व तुम्हाला खोट्या केसमध्ये अडकून जेलमध्ये टाकू अशी धमकी दिली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज