mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

संत दामाजीनगर व चोखामेळानगर विलीन होणार,नगरपरिषदेचा हद्दवाढीचा प्रस्ताव

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
संत दामाजीनगर व चोखामेळानगर विलीन होणार,नगरपरिषदेचा हद्दवाढीचा प्रस्ताव



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा नगरपरिषदेने हद्दवाढीचा प्रस्ताव दिला आहे , अशी माहिती जिल्हा प्रशासन अधिकारी पंकज जावळे यांनी दिली.मंगळवेढा नगरपरिषदेने यापूर्वी २१ फेब्रुवारी २०१३ रोजी हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाला दिला होता . पण या प्रस्तावाचा कालावधी संपुष्टात आल्याने नव्याने शासनाकडून पुन्हा २७ एप्रिल २०१७ रोजी पत्र पाठवून नवीन प्रस्ताव सादर करण्याबाबत सूचित केले होते.

त्यानुसार २२ जून २०१७ रोजी नगरपरिषदेने पुन्हा हद्दवाढीबाबत ठराव केला व नवीन आराखडा तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे. जिल्हाधिकारीमिलिंद शंभरकर यांच्याबरोबर या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली व त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.मंगळवेढा नगरपरिषदेची स्थापना १८७४ ला झाली आहे.त्या काळापासून नगरपालिकेचे क्षेत्र १.४८ चौरस किलोमीटर आहे.

आता मंगळवेढा शहराभोवती असलेल्या संत दामाजीनगर व चोखामेळानगर या नगरांचे ग्रामपंचायतीत रुपांतर झाले आहे.या दोन्ही ग्रामपंचायतीची लोकसंख्या सन २००१ मध्ये ६ हजार ८२४ तर सन २०११ मध्ये १ हजार ७४३ इतकी झाली आहे.

त्यामुळे मंगळवेढा शहराची हद्दवाढ केल्यास या दोन्ही ग्रामपंचायती नगरपरिषदेत विलीन होणार आहेत.नवीन हद्दवाढ भागात दक्षिण पूर्वेकडील बोराळे ते मरवडे रस्त्यामधील जमीन गट , उत्तर पूर्वेचे धर्मगाव ते बोराळे रस्त्यामधील गट , दक्षिण पश्चिम भागातील मरवडे व सांगोला रस्त्यामधील गट , वायव्येस धर्मगाव ते डोंगरगाव , खोमनाळ रस्त्यामधील गट , तेथून अकोले,पंढरपूर रोडमधील गट अशा भागाचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे . पहिल्या ठरावास काही लोकप्रतिनिधींनी विरोध केल्याने बारगळला होता.

पण आता संत दामाजीनगर व चोखामेळानगर या ग्रामपंचायतीला नगरपरिषदेच्या सुविधा आहेत. दोन्ही ग्रामपंचायतीकडे रेकॉर्ड उपलब्ध नसल्याने अनधिकृत बांधकामे वाढत आहेत,त्याचबरोबर पाणीपुरवठा व इतर सुविधांचा खर्च वाढल्याने हद्दवाढ करण्यावर आता एकमत होत आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMangalWedha

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
शासकीय सवलतींचा लाभ मिळण्यासाठी आता हा कायदा सक्तीचा होणार?

शासकीय सवलतींचा लाभ मिळण्यासाठी आता हा कायदा सक्तीचा होणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

June 21, 2026
३ वर्षांचं वय अन् काळजाचा थरकाप उडवणारा विक्रम! पोलीस पुत्राने १४ पायऱ्यांची उभी भिंत चढून जाज्वल्य डोरलेचा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये इतिहास रचला

३ वर्षांचं वय अन् काळजाचा थरकाप उडवणारा विक्रम! पोलीस पुत्राने १४ पायऱ्यांची उभी भिंत चढून जाज्वल्य डोरलेचा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये इतिहास रचला

June 21, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

शेतकऱ्यांच्या संयमाचा विजय! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात शेतीसाठी मिळणार आता आठ तास वीज; ‘टाळे ठोकू’ इशाऱ्याची प्रशासनाने घेतली धडक दखल

June 21, 2026
मंगळवेढेकरांनो! दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालय व इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन; ‘ही’ प्रसिद्ध सिनेअभिनेत्रीची असणार उपस्थिती

दहावीच्या निकालात मोठा उलटफेर! पुनर्मूल्यांकनानंतर मंगळवेढ्याची पाटील महाराष्ट्रात सर्वप्रथम; मंगळवेढा इंग्लिश स्कूलच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

June 20, 2026
धक्कादायक! ज्या रुग्णालयात हजारो रुग्णांवर उपचार केले तिथंच घेतला अखेरचा श्वास; सोलापूरमधील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ.शिरीष वळसंगकर यांनी जीवन संपवलं

सोलापुरात खळबळ! देवमाणूस गेला, पण मागे वादाची ठिणगी पडली; डॉ. वळसंगकर यांच्या कुटुंबातील ‘तो’ वाद अखेर चव्हाट्यावर; पोलिसांसमोर मोठा खुलासा

June 20, 2026
बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

मोठी बातमी! सरकारी जमिनी हडपणाऱ्यांना मोठा दणका… ‘या’ जमिनींवर आता थेट महाराष्ट्र शासनाचे नाव लागणार…;  ‘इतक्या’ महिन्यांचा अल्टीमेटम

June 20, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा