मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे ‘आयएएस’च्या प्रशिक्षणासाठी मसुरीला जाणार आहेत. या प्रशिक्षणासाठी राज्यातील १८ आयएएस अधिकाऱ्यांची निवड झाली आहे.
दि.८ मे ते २ जून या कालावधीत जिल्हा हे प्रशिक्षण होणार आहे. दरम्यान या कालावधीसाठी सोलापूरच्या प्रभारी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
पदभार देण्याची ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. मसुरी येथील लालबहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये ८ मे ते २ जून या कालावधीत चौथ्या टप्प्यातील प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या प्रशिक्षणासाठी देशभरातील आयएएस अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून १८ आयएएस अधिकारी या प्रशिक्षणात सहभागी होणार आहेत.
काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे दोन वेळा मसुरी येथे आयएएस प्रशिक्षणासाठी गेले होते.
प्रशासनातील जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व झेडपीचे सीईओ दिलीप स्वामी या दोन्ही अधिकाऱ्यांचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे.
राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांची आगामी काळात बदली होऊ शकते, अशी शक्यता व चर्चा असताना जिल्हाधिकारी शंभरकर हे प्रशिक्षणासाठी मसुरीला जात आहेत.
येत्या काळात जिल्ह्याच्या प्रशासनात काही महत्वाच्या घडामोडी घडतात का? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज