टीम मंगळवेढा टाईम्स ।
अल्पवयीन मुलीला धमकावून तीच्यावर अत्याचार करून तीला गर्भवती केल्याप्रकरणी योगेश मोहन ताटे (रा. घरनिकी) याच्याविरूध्द बाल लैंगिक अत्याचार कायदयानुसार गुन्हा नोंदवून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील पिडीत अल्पवयीन मुलगी शेळया राखण्यास दि.१५ व दि.२५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.०० वा. शेळया राखण्यासाठी तळयाच्या बाजूस जात असताना
यातील आरोपी योगेश ताटे याने पिडीतेस दमदाटी करून भिती घालून तीच्यावर दोन वेळा अत्याचार केला.
वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासून घेतले असता तीच्या पोटात २१ आठवडयाची गर्भधारणा झाली असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले.
याची फिर्याद पिडीतेच्या कुटुंबियांनी दाखल केली असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक अमोल बामणे करीत आहेत.
गोडावून समोरून दोन लाख रुपयांच्या टमटमची चोरी
अज्ञात चोरट्याने गोडाऊन समोर उभा केलेला २ लाख रुपये किमतीचा टमटम चोरून नेल्याची घटना ५ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सुभाष मारुती बनकर रा.पुजारवाडी , सांगोला यांच्याकडे पेप्सी आणि बिसलेरी एजन्सी असून सांगोला-मिरज रोडवरील हॉटेल माऊलीच्या पाठीमागे त्यांचे गोडावून आहे.
दि.५ जुलै रोजी मॅनेजर विजय भगवान बुंजकर रा.जुना मेडशिंगी रोड , सांगोला याने एमएच ४५ टी ११ ९ ५ हे टमटम उभे केले होते.
त्यानंतर मंगळवार ६ जून रोजी सकाळी दहाच्या सुमारास एजन्सीमध्ये सेल्समन म्हणून कामास असणारे समाधान सदाशिव भुसे हे माल भरण्यासाठी गोडाऊन समोर आले होते.
त्यावेळी त्यांना सदर अशोक लेलँड दोस्त कंपनीचे टमटम लावलेल्या ठिकाणी दिसून आले नाही म्हणून त्यांनी सुभाष बनकर व मॅनेजर यांना गाडीबाबत सांगितले.
यावेळी सर्वांनी सदर टमटमची आजूबाजूला चौकशी केली असता सदर गाडी मिळवून आली नाही. कोणीतरी अज्ञात चोरट्याने सदरचे दोन लाख रुपये किमतीचे टमटम चोरून नेल्याची खात्री झाली.
याबाबत सुभाष मारुती बनकर यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज