टीम मंगळवेढा टाईम्स ।
शिक्षण मंगळवेढा प्रसारक मंडळ, मंगळवेढा संचलित इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज, शिवतेज प्राथमिक शाळा व दलितमित्र कदम गुरुजी सायन्स कॉलेज मंगळवेढा यांच्या वतीने इंग्लिश स्कूल , मंगळवेढा प्रशालेत दलित मित्र कदम गुरुजी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दि.०७ जुलै ते १० जुलै २०२१ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि .०७ जुलै रोजी सकाळी आठ वाजता दलित मित्र स्व.कदम गुरुजींच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक निघणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष अरुणा माळी , माजी खासदार जयसिंगराव गायकवाड , डॉ . मिनाक्षी कदम , प्रियदर्शनी महाडीक , विलास शिंदे , रामसिंग हजारी , अॅड.दिवाण , सुरेश येलपले , अजित जगताप इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
त्यानंतर सकाळी ११ वाजता श्यामची मम्मी या दोन अंकी धमाल विनोदी नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.
याचे उद्घाटन संदीप पाटील , गोपाळ देशमुख , डॉ . वाहुळ अॅड.शैलजा मोळक , एस एस भोसले , यतीराज वाकळे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
दिनांक ८ जुलै रोजी डॉ.श्री सकाळी नऊ वाजता पशुप्रदर्शन या एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
याचे उद्घाटन सभापती प्रेरणा मासाळ , पंडित लोहकरे , सुखबीरसिंग , अॅड.विजय खांडेकर , राम नेहरवे , शिवाजी पाटील इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे . दुपारी तीन वाजता कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन तहसीलदार स्वप्नील रावडे , डॉ.सुभाष कदम , रामचंद्र शिंदे , माजी आमदार शरद पाटील , आप्पासाहेब चोपडे , नामदेव पडवळे , मारुती वाकडे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
दि.९ जुलै रोजी सकाळी दहा वाजता रक्तदान शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री दत्तात्रय भरणे , प्रा . तेजस्विनी कदम , निर्मलाताई ठोकळ , डॉ.लोळगे , जयकुमार शितोळे , सर्जेराव सावंत , अजिता भोसले , शिवाजीराव पवार ,डॉ.शेखर साखरे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
त्यानंतर कार्यानुभव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि.१० जुलै रोजी सकाळी आठ वाजता एरो मॉडेलिंगची चित्तथरारक अशी प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली असून याचे उद्घाटन काळ डॉ.श्री व सौ.कमल माणिकराव साळुखे , विद्यापीठ पुणे , श्रीकांत पाटील राजाभाऊ चेळेकर , अॅड.विनायक नागणे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
सकाळी ० ९ वाजता ग्रंथप्रकाशन व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्कारचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळचे संपादक अभय दिवाणजी , सादिक काझी , डॉ.महेश्वर कळलावे , रमेश चौगुले श्री व सौ ऐश्वर्या सचिन पवार , शिवाजी बागल , बालाजी वाघमोडे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
संस्थेचे अध्यक्ष अॅड.सुजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या दलितमित्र कदम गुरुजी जन्मशताब्दी महोत्सव समिती मार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी विद्यार्थी पालक व प्रेक्षकवर्ग सोशल डिस्टंसिंग नियमांचे काटेकोरपणे पालन करत विविध कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशालेचे प्राचार्य शिवाजी चव्हाण यांनी . यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज