टीम मंगळवेढा टाईम्स ।
श्री संत दामाजी साखर कारखान्याच्या जुन्या व नव्या सभासदांना गुढीपाडवा निमित्त शहर व ग्रामीण भागातील साखर वाटप केंद्रातून साखर वाटपास सभासदांच्या मागणीवरून मुदतवाढ देण्यात आली असून, ही साखर वाटप आज दि.२४ मार्चपर्यंत सुरू ठेवण्यात आल्याची माहिती अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी दिली.
दामाजी कारखान्याकडे पूर्वी ३० हजार सभासद होते. कारखान्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता मंजुरी घेतलेल्या १० हजार नव्या सभासदांना साखर मिळणार की नाही, याबाबत चर्चा होती.
मात्र संचालक मंडळाने नव्या सभासदांनाही साखर वाटप करण्याचा निर्णय घेतला. साखरेचे वाटप २२ मार्चपर्यंत सुरू ठेवण्यात आले, पण सभासदांची मागणी लक्षात घेऊन मुदतवाढ देण्यात आली.
तसेच कारखान्याच्या हंगाम २०२२-२३ मधील शिल्लक कोरडी प्रेसमड १३०० रुपये प्रतिटन दराने मागेल त्या शेतकरी, सभासदांना देण्याची व्यवस्था करण्यात आली.
सभासदांनी आपल्या गावातील संबंधित साखर विक्री केंद्र येथून ओळखीचा पुरावा देऊन आपले कार्ड व साखर घेऊन जावे.
राहिलेल्या सभासदांची साखर कारखाना साईटवर सुटीचे दिवस सोडून…
तसेच ठरवून दिलेल्या वेळेत उचल न केलेल्या सभासदांची साखर कारखाना साईटवर सुटीचे दिवस सोडून दर शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत वाटप केली जाणार असल्याची माहिती उपाध्यक्ष तानाजी खरात यांनी दिली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज