mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

महिलांनो! आज आषाढी दीप अमावस्या! पूजेसाठी पिठाचा दिवाला विशेष महत्त्व; कसं कराल दीपपूजन?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 17, 2023
in आरोग्य
महिलांनो! आज आषाढी दीप अमावस्या! पूजेसाठी पिठाचा दिवाला विशेष महत्त्व; कसं कराल दीपपूजन?

मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।

आज आषाढ अमावस्या किंवा दीप अमावस्या असं म्हटलं जातं. त्याशिवाय गुजरातमध्ये हरियाली अमावस्या, कर्नाटकात भीमाना अमावस्या तर आंध्रप्रदेशात चुकाला अमावस्या या नावाने ओळखली जाते.

जी अमावस्या सोमवारी येते तिला सोमवती अमावस्या असं म्हणतात. चातुर्मासातील पहिली अमावस्या झाल्यानंतर श्रावणाला सुरुवात होते. आजच्या अमावस्येला दिव्यांची पहाट असंही संबोधलं जातं.

आज घरात दिवे लावून आणि रांगोळी काढून पूजा केली जाते. या पूजेसाठी पिठाचा दिवाला विशेष महत्त्व असतो.

आज पितरांसाठी यज्ञ आणि दान केल्याने पुण्य लाभतं, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. ही दिव्यांची पूजा म्हणजे श्रावणाच्या आगमानाची तयारी आणि स्वागत म्हणून केली जाते. असं म्हणतात की, आजच्या दिवशी पिठाचा किंवा बाजरीचा दिवा दक्षिण दिशेला लावला पाहिजे.

घरातील दक्षिण ही पितरांची दिशा असते असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. म्हणून आजच्या अमावस्येला दक्षिण दिशेला दिवा लावल्यास घरात सुख समृद्धी शांती लाभते.

अशी करा पूजा!

आज घरातील सर्व दिवे स्वच्छ करा. पूजा घराजवळ एक पाट ठेवा आणि त्याच्या अवतीभोवती रांगोळी काढ. पाटावर स्वच्छ लाल वस्त्र घालून त्यावर दिव्यांची मांडणी करा. हे दिवे तिळाच्या तेल किंवा तुपाने प्रज्वलित करा. दिव्यांना फुलं अर्पण करा आणि नैवेद्य दाखवा. अनेक ठिकाणी आजच्या दिवशी पुरणाचे दिंड बनवण्याची प्रथा आहे.

पूजा झाल्यानंतर ‘दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजस: तेज उत्तमम । गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव:॥’, या मंत्राचा जप करा. या मंत्राचा अर्थ असं होतो की, हे दीपदेवा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस, तेजामध्ये उत्तम तेज आहेस. मा‍झ्या पूजेचा स्वीकार कर आणि मा‍झ्या सर्व इच्छा पूर्ण कर, असा होतो.

दीप अमावस्या महत्व

दीप अमावस्या म्हणजे अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा हा सण असतो. दिवा हा मांगल्याचं प्रतिक आहे. त्यामुळे हिंदू धर्मात चांगल्या वाईट प्रसंगी दिव्या लावण्याची परंपरा आणि प्रथा आहे. दीप अमावस्येला दिव्यांची पूजा ही मांगल्य, समृद्धी आपल्या आयुष्यात आणते.

आजच्या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ एक दीप प्रज्ज्वलित नक्की करा. अमावस्येला हा विधी केल्याने पितरांना मुक्ती मिळते आणि ते पुढील पिढीला आशीर्वाद मिळतो, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(माहितीसाठी – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. मंगळवेढा टाईम्स न्युज या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: दीप अमावस्या

संबंधित बातम्या

धक्कादायक! ज्या रुग्णालयात हजारो रुग्णांवर उपचार केले तिथंच घेतला अखेरचा श्वास; सोलापूरमधील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ.शिरीष वळसंगकर यांनी जीवन संपवलं

मोठी खळबळ! सोलापुरचे डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणात मनिषाचा हादरवणारा मेल पोलीसांच्या हाती; आतापर्यंत काय काय झालं? जाणून घ्या

June 18, 2025
नागरिकांनो! ‘नवजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल & ICU’चा आज मंगळवेढ्यात उद्घाटन सोहळा

नागरिकांनो! ‘नवजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल & ICU’चा आज मंगळवेढ्यात उद्घाटन सोहळा

June 8, 2025
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

अधिकारी असावा तर असा! सोलापूर जिल्ह्यातील सहा गाव पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी घेतली दत्तक; काय आहे संकल्पना, जाणून घ्या…

June 7, 2025
पंढरीतील महाआरोग्य शिबिरात ५००० वैद्यकीय कर्मचारी वारकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध असणार; आरोग्यमंत्री सावंत यांची संकल्पना

लय भारी सुविधा! थकवा जाण्यासाठी वारकऱ्यांना मिळणार पाय दाबण्याचे मशीन; पाऊस आल्यास वारकऱ्यांसाठी टेंट उभारण्यात येणार

June 4, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! सिझरनंतर अतिरक्तस्राव, दुसऱ्या रुग्णालयात नेलं, पण महिलेनं जीव गमावला; रुग्णालय चालक दवाखान्याला कुलूप लावून पसार

June 3, 2025
मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातून रामचंद्र सलगर शेठ उमेदवारी अर्ज दाखल करणार; ओबीसी उमेदवारीमुळे काटे की टक्कर होणार

रामचंद्र सलगर (शेठ) यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या धर्मगावात मोफत आरोग्य तपासणी शिबीर; औषध वितरण सोहळा व विविध कार्यक्रमाचे आयोजन

May 31, 2025

बापरे! आषाढी एकादशीपूर्वी कोविड पोहचला सोलापूर जिल्ह्यात; ‘या’ तालुक्यात दोन पॉझिटिव्ह रुग्ण, प्रशासनाची चिंता वाढली

May 31, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! चालत्या गाडीवरच आला तरुणाला हृदयविकाराचा झटका; काही सेकंदात होत्याचं नव्हतं झालं

May 29, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

नागरिकांनो! महाराष्ट्राला धडकी भरवणारी बातमी; ‘या’ जिल्ह्यात 21 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू

May 25, 2025
Next Post
दुर्दैवी! मंगळवेढा तालुक्यात पावसाचा हाहाकार, वीज पडून 13 वर्षीय मुलीचा मृत्यू

Weather update! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; पाहा हवामान अपडेट

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

याद राखा..! शेतकऱ्यांना फसवणाऱ्या विमा कंपन्यांवर सरकार करणार आता ‘ही’ कडक कारवाई; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची घोषणा

July 3, 2025
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सायबरतज्ज्ञांनी भर सभागृहात सोलापूर जिल्ह्यात अधिकाऱ्याचा मोबाइल केला ‘हॅक’; दक्षता कशी जाणून घ्या…

July 2, 2025
मर्चंट नेव्हीतील अधिकार्‍यावर हल्ला; माजी सरपंचासह 5 जणांना पोलिस कोठडी

भयानक! वाळू टाकण्याच्या वादातून तरुणाला अपहरण करून संपवलं; मृतदेह आडरानात फेकला; नेमके घडले काय?

July 2, 2025

ट्रॅक्टर खरेदीसाठी दीड लाख रुपयांचे अनुदान मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा; शेतकऱ्याचा खर्च 70 टक्के कमी होणार

July 2, 2025
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

डोळे पाणावले! मुलीच्या लेकाने केला वारीचा हट्ट; आजीसमोरच नातू नदीत वाहून गेला; मृतदेह शोधासाठी वारकऱ्यांचा रास्ता रोको

July 2, 2025
रतनचंद शहा बँकेच्या सर्व खातेदारांच्या ठेवी सुरक्षित : चेअरमन राहुल शहा

राज्य कार्यक्षेत्र असणाऱ्या रतनचंद शहा सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम सुरू; १५ जागांसाठी ‘इतके’ अर्ज दाखल

July 2, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा