टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागात मोठया प्रमाणात बेकायदा वाळू वाहतूक होत असल्याची माहिती पोलिस प्रशासनास मिळताच पोलिसांनी बिगर नंबरचा एक पिक अप व बिगर नंबरचा टिपर तसेच वाळू वाहतुकीस मदत करणारी
एक बिगर नंबरची स्कार्पिओ अशी तीन वाहने पोलिसांनी जप्त करून उमेश ताड, सतीश आवताडे, मारुती जाधव (रा. पंढरपूर), अज्ञात पिक अप चालक व मालक तसेच धनाजी जानकर सोमनाथ रोडगे, श्रीकांत पवार यांच्याविरूध्द गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी पहिल्या घटनेत यातील आरोपी उमेश ताड, सतीश आवताडे (रा. एकलासपूर), मारुती जाधव (रा.शिरगांव) व पिक अप चालक व मालक यांनी दि.१७ रोजी पहाटे ४.०० वा. संगनमत करून
महिंद्रा कंपनीच्या बिगर नंबरच्या टिपरमध्ये गौण खनिज वाळू विना परवाना चोरून भरत असताना मिळून आल्याने पोलिस शिपाई तेजस मोरे याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसऱ्या घटनेत आरोपी धनाजी जानकर (कोपटे वस्ती, सांगोला), सोमनाथ रोडगे, श्रीकांत पवार (रा. वाढेगाव) यांचे ताब्यातील टिपरमधून शासनाची कुठलीही परवानगी न घेता अवैधरित्या वाळू उपसा करून घेवून जात असताना पोलिसांना मिळून आले.
वाळू वाहतुक करताना त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याकरीता काळ्या रंगाची बिगर नंबरची स्कार्पिओ पोलिसांनी जप्त केली आहे. दरम्यान, वाळू व्यवसायात तीन्ही वाहनांना नंबर नसल्याचे पोलिसांना दिसून आले.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी साध्या मोटर सायकलला नंबर प्लेट नसल्यानंतर तात्काळ दंड करतात. येथे चक्क वाळू चोरीच्या गुन्हयात बिगर नंबरची वाहने सर्रास वापरली जात असताना त्यांच्यावर हे अधिकारी व वाहतुक शाखेच पोलिस कारवाई का करत नाहीत असा संतापजनक सवाल सुज्ञ नागरिकांतून व्यक्त होत आहे.
सध्या पाण्याअभावी माण व भिमा नदी कोरडी पडत असल्याने बेकयदा वाळू उपशाला जोर वाढला असल्याचे नागरिकांचे मत आहे. लोकसभेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा गुंतल्याने त्याचा वाळू माफिया गैरफायदा घेत असल्याचा आरोप होत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज