टीम मंगळवेढा टाइम्स ।
मंगळवेढा शहरातील विविध विकास कामासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केल्यानुसार मंगळवेढा शहरातील रस्ते व गटार या कामाकरिता 3.98 कोटी मंजूर झाल्याची माहिती बाळासाहेबांची शिवसेना शहर प्रमुख प्रतिक किल्लेदार यांनी दिली.
मंगळवेढा शहरातील सांगोल नाका ते बोराळ नाका रस्ते व गटार करणे 2.25 लाख हजारे गल्ली ते प्रवीण हजारे रस्ता डांबरीकरण करणे 22 लाख,
गजानन उन्हाळे घर ते केशव पडवळे घर रस्ता काँक्रिटीकरण करण करणे 10 लाख,
दिगंबर यादव ते सांगोल रस्ता 20 लाख
चंद्रकांत पवार घर ते प्रकाश नलवडे घर समोर रस्ता करणे सुरवसे बोळ ते मुख्य रस्ता कॉंक्रिटीकरण करणे व गटार करणे 19 लाख,
अशोक लेंडवे घर ते बळीराजा बँक काँक्रिटीकरण करणे 10 लाख बबन चव्हाण घर ते सांगोला रोड गटार बांधणे 16 लाख कल्याण प्रभू ते नागणेवाडी नगरपालिका हद्द रस्ता 24 लाख,
चोखामेळा चौक ते मुरलीधर चौक रस्ता डांबरीकरण करणे 12 लाख ढाणे घर ते महादेव मंदिर रस्ता व गटार 10 लाख टीकाचार्य मंदिर ते लोकमंगल सभागृह बोळ काँक्रीट करण करणे समाधान हेंबाडे घर ते लक्ष्मण सावंजी घर 10 लाख,
वरील सर्व कामे मंजूर झालेले असून लवकरात लवकर सर्व कामांचे विविध प्रसिद्धी करून सर्व कामे चांगल्या दर्जाचे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
सदर निधी मंजूर करण्यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ.प्रशांत परिचारक, आ. समाधान आवताडे यांचे सहकार्य लाभले असल्याचे किल्लेदार यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज