टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी येथील एकाच कुटुंबातील ३ जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कंदलगांव ता. दक्षीण सोलापूर येथील रहीवासी असलेले व तहसिल कार्यालय मंगळवेढा येथे कामास असलेले एका महसुल कर्मचारी पुरुष व्यक्तीचा दि.15 जुलै रोजी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
तथापी खबरदारीचा उपाय म्हणुन तहसिल कार्यालय मंगळवेढा येथील त्यांचे निकट संपर्कात ( high risk contacts ) असलेल्या व्यक्ती आणि मंगळवार दि.14 जुलै रोजी पॉझिटिव्ह आलेल्या 3 व्यक्तींचे निकट संपर्कातील व्यक्तींचे असे एकुण 51 व्यक्तींचे कोरोना रॅपीड अॅन्टीजन टेस्ट मंगळवेढा येथे करण्यात आली आहे.
त्यापैकी 48 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत व 3 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यामध्ये मंगळवेढा तहसिल कार्यालय येथील कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील आलेले आधिकारी आणि कर्मचारी यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
परंतु मंगळवार दि.14 जुलै रोजी पॉझिटिव्ह आलेल्या 3 व्यक्तींचे निकट संपर्कापैकी एका व्यक्तीचे कुटुंबातील 3 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. सदर तीन व्यक्ती एकाच कुटुंबातील असुन कचरेवाडी येथील रहीवासी आहेत. त्यांची प्रकृती व्यवस्थित असुन त्यांना कोविड केअर सेंटर मंगळवेढा येथे विलगीकरण कक्षात ठेवणेत आलेले आहे.आवश्यकते नुसार पुढील कार्यवाहीसाठी प्रशासन सज्ज आहे असे आवाहन उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी केले आहे.
Maharashra solapur mangalwedha kacharewadi Three members of the same family contracted corona
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज