मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । बारामती तालुक्यात विविध ठिकाणी लॉक डाऊनमध्ये विनाकारण मोटरसायकल वर फिरणे व दुकानदाराने सूचनांचे पालन न केल्याबाबत बऱ्याच जणांवर गुन्हे दाखल केले होते. त्यापैकी आज बुधवारी (दि.01) न्यायालयाने तिघांना शिक्षा सुनावली, अशी माहिती बारामतीचे पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर यांनी दिली.
अफजल बनीमिया आत्तार (वय 39 रा.श्रीरामनगर ता.बारामती जि.पुणे.), चंद्रकुमार जयमंगल शहा (वय 38 रा.सुर्यनगरी ता.बारामती जि.पुणे), अक्षय चंद्रकांत शहा (वय 32 रा.वडगाव निंबाळकर ता.बारामती जि.पुणे) अशी शिक्षा झालेल्यांनी नावे आहेत. या सर्व आरोपींना प्रत्येकी तीन दिवस कैद किंवा 500 रुपये दंडाची शिक्षा दिली आहे.
बारामती तालुका पोलीस स्टेशन वरील तिघांवर कलम 188 प्रमाणे गुन्हा नोंद होता. शिक्षा झालेल्या व्यक्तीवर भविष्यकाळात चारित्र्य पडताळणी मध्ये शिक्षा झाली म्हणून कोणतीही शासकीय किंवा खाजगी नोकरी मिळणार नाही. त्याचबरोबर भविष्यकाळात पासपोर्ट, शस्त्र परवाना , व्यवसाय परवाने मिळताना मोठी अड़चण निर्माण होणार आहे आपल्या थोड्या चुकीमुळे आपले स्वतःचे भविष्य अंधारात टाकणारे हे पाऊल आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी आपल्या स्वतःच्या घरात बसून गंभीरपणाने लॉक डाऊन चे पालन करणे आवश्यक आहे, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक, शिरगावकर यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज