मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा शहरातील पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या संजिवनी हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूस गाडीच्या डिकीत ठेवलेले १ लाख रुपये चोरट्यांनी चोरले असल्याची घटना दुपारी १२ च्या सुमारास घडली आहे.
जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
याबाबत सविस्तर माहिती अशी की,अनिल चौगले रा.गुंजेगाव यांनी पंढरपूर अर्बन बँकेतून १ लाख रुपये रोख रक्कम काढून ती गाडीच्या डिकीत ठेवली होती.
अनिल चौगुले यांनी मामाला देण्यासाठी पैसे घेऊन जात होते.दुकानाच्या बाहेर गाडी लावून लघुशंका करण्यासाठी गेले असता चोरट्यांनी या संधीचा फायदा घेत डिकीत ठेवलेले १ लाख रुपयांची रक्कम बनावट चावी लावून डिकी उघडून रक्कम चोरून नेली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज