मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
जातपडताळणी समिती सोलापूर यांचे समोर खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांचे तर्फे सन 1950 पूर्वीचे दोन मोठे पुरावे सादर करण्यात आले.
ज्यामध्ये त्यांची जात बेडा जंगम आहे असे स्पष्टपणे दिसून येते. सदर पुरावे हे सन 1944 व 1947 या सालातील असून खासदार जय सिद्धेश्वर महाराज यांचे वडील गुरू बमय्या नूरूंदया हिरेमठ हे बापूयमाजी पाटील यांची जमीन कसत असल्याचा फसल उतारा ज्यामध्ये बसय्या नूरुंदया हिरेमठ हे बेडा जंगम बटाईने आठ वर्षे कसतो अशी नोंद दिसून येते.
सदर पुरावे दाखल केल्यानंतर जात पडताळणी समितीने दोन्ही पुरावे दक्षता पथकाकडे पाठवून त्या बाबतचा अहवाल दक्षता पथकाकडून मागवलेला आहे .
जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
त्याकरिता पुढील सुनावणीची ताटीख । फेब्रुवारी 2020 ही नेमण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे खासदार जय सिद्धेश्वर महाराज यांचे तर्फे अॅड संतोष न्हावकर यांनी यापूर्वी तक्रारदाराकडून जात पडताळणी चे अध्यक्ष व सदस्य यांना दिलेल्या धमकी बाबत व कोटांचा अवमान केल्याबाबत त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करावी असा अर्ज दिलेला होता . परंतु त्यावर समितीने कोणतीही कारवाई केलेली नसल्याने सदर दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज मागवावे व त्यांचे विरुद्ध फौजदाटी गुन्हा दाखल करावा तसेच मुंबई उच्च न्यायालय येथे अवमान याचिका दाखल करावी व सदर संपूर्ण प्रक्रिया अंतिम निकालापूर्वी करण्यात यावी अशी नव्याने अर्ज दाखल करून मागणी करण्यात आली .
निकालापूर्वी करण्यात यावी अशी नव्याने अर्ज दाखल करून मागणी करण्यात आली . यात खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या तर्फे अॅड संतोष न्हावकर , अॅड स्वामी ( औरंगाबाद ) ॲड योगेश कुरे हे काम पाहत आहेत
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज