टीम मंगळवेढा टाईम्स ।
चोरट्याने घर समजून ग्रामपंचायत कार्यालय फोडून कार्यालयातील लोखंडी ड्रावरमधील फायलीसह कागदपत्रे बाहेर काढून अस्ताव्यस्त फेकले.
मात्र, हाती काहीच न लागल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास वाकी शिवणे (ता. सांगोला) ग्रामपंचायत कार्यालयात घडली.
याबाबत ग्रामसेवक शहाजी इंगोले यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. वाकी-शिवणे ग्रामपंचायतीचे कार्यालय सांगोला-महूद रोडवर मारुती मंदिराशेजारी आहे.
दरम्यान, पंचायत राज समितीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कार्यालयास रंगरंगोटी केली होती. रंगरंगोटीमुळे ग्रामपंचायत कार्यालयाचे नाव पुसले गेले.
रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांना ते घरच वाटत होते. दरम्यान, सांगोला-महूद रस्त्यालगत असलेले हेच ग्रामपंचायत कार्यालय चोरट्यांनी घर समजून कार्यालयाचे कुलूप कोयंडा तोडून आत प्रवेश केला.
अंधारातच चोरट्यांनी लोखंडी कपाट उघडून आतील फायली, कागदपत्रे बाहेर फेकली. रविवारी सकाळी सहाच्या सुमारास लिपिक सारिका पळसे यांना
ग्रामपंचायत कार्यालय फोडल्याचे समजताच त्यांनी ही घटना सरपंच पार्वती आलदर व ग्रामसेवक इंगोले यांना कळविली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज