टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे घरासमोर लावलेली बजाज कंपनीची पंधरा हजार रुपये किमतीची मोटरसायकल चोरट्याने चोरून नेल्या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात दिवसेंदिवस मोटर सायकल चोरीच्या घटनेत वाढ होत असल्याने मोटरसायकलस्वार धस्तावले आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी यातील फिर्यादी लक्ष्मण शिंदे यांची रात्री नऊ ते दहा दरम्यान अंकुश गरंडे यांचे नंदेश्वर येथील घरासमोर लावलेली
पंधरा हजार रुपये किमतीची बजाज कंपनीची एम एच १३ सी.एच .८८ १४ या क्रमांकाची
मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. त्या चोरट्याचा शोध पोलीस घेत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज