टीम मंगळवेढा टाईम्स ।
संगणकीकृत सात-बारा उताऱ्याच्या नमुन्यात बदल करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नव्या स्वरुपातील सात-बारा उतारा नागरिकांना आता लवकरच उपलब्ध होणार आहे.
तो सर्वसामान्यांना सहज समजेल, असा असणार आहे.जमिनीच्या मालकी हक्काचा पुरावा म्हणून सात-बारा उतारा वापरला जातो. अनेकदा बनावट सातबारा उतारा दाखवून जमीन लाटणे, त्यांची खरेदी-व्रिकी आदी प्रकार यापूर्वी घडले आहे आणि घडत आहेत.
सात-बारा उतारा हा शासकीय भाषेत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तो समजत नाही. त्यातून हे प्रकार घडतात. त्यामुळे संगणकीकृत सात-बारा उताऱ्याच्या नमुन्यात बदल करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला.
याविषयी उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले की, ‘नव्या सात-बारा उताऱ्यावर शासनाचा व ई-महाभूमीचा लोगो असलेला वॉटरमार्क तसेच गावाच्या नावाचा कोड असणार आहे.
तर शेती आणि बिनशेतीसाठी वेगवेगळा सात-बारा उतारा असणार आहे.राज्यात सुमारे अडीच कोटी सात-बारा उतारा आहेत. त्यापैकी जवळपास 99 टक्के उताऱ्यांच्या नमुन्यात बदल करण्याचे काम पूर्ण झाले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज