मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
कोरोनाचे मुंबईत 56 रुग्ण सक्रिय आहेत. हे सर्व रुग्ण मुंबई महापालिकेच्या हद्दीतील आहेत, तर राज्यातील इतर जिल्ह्यांपैकी केवळ पुण्यात नव्याने रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मुंबईपाठोपाठ पुण्यातही कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. पुण्यातील 87 वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाली आहे.
मुंबईनंतर आता पुण्यातही कोरोनाचा शिरकाव झाला असून शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 87 वर्षीय पुरुषाला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आलं आहे. यंदाच्या वर्षातील पुण्यातील हा पहिलाच रुग्ण असल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
या वर्षी जानेवारीपासून आतापर्यंत कोरोनाचे 87 रुग्ण आढळले होते. त्यापैकी 31 बरे झाल्याने सध्या 56 जणांवर घरीच उपचार सुरू आहेत. सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
परंतु, महाराष्ट्रात सध्या 57 रुग्ण सक्रिय असून, यापैकी केवळ एक रुग्ण पुण्यात असून उर्वरित सर्व रुग्ण राजधानी मुंबईत आहेत. त्यामध्ये मे महिन्यात किंचित वाढ झाली असली, तरी ती संख्या एखाद्या ठिकाणावरून नसून, विखुरलेल्या स्वरूपातील आहे, असेही आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे.
घाबरून जाण्याचे कारण नाही
कोरोना विषाणू सध्याचा सौम्य स्वरूपाचा उपप्रकार असल्याने घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याआधी जानेवारीत दोन, फेब्रुवारीमध्ये एक आणि एप्रिलमध्ये चार रुग्णांचे निदान झाले होते. मार्चमध्ये एकही कोरोना रुग्ण आढळून आला नव्हता.
या वर्षी कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू नाही
आरोग्य विभागाने सोमवारी 46 चाचण्या केल्या. त्यापैकी आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या 15 होती, तर रॅपिड चाचण्यांची संख्या 31 होती. दरम्यान, 2024 मध्ये चार लाख 84 हजार 352 कोरोना तपासण्या केल्या होत्या.
त्यापैकी पाच हजार 528 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून, त्यापैकी 35 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद केली आहे. मात्र, या वर्षी कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज