mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

नातेवाईक आक्रमक! मंगळवेढ्यात विजेच्या धक्क्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू; महावितरणच्या प्रवेशदारावर मृतदेहासह आंदोलन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 21, 2025
in क्राईम, मंगळवेढा
नातेवाईक आक्रमक! मंगळवेढ्यात विजेच्या धक्क्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू; महावितरणच्या प्रवेशदारावर मृतदेहासह आंदोलन

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

वीज पुरवठा बंद करून वीज दुरुस्तीचे काम करत असताना अचानक वीजेचा धक्का बसून आतीश जयराम लांडे या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवेढ्यातील नागणेवाडी येथे घडली.

दरम्यात यात दोषींवर कारवाई होत नाही तो पर्यंत मृतदेह महावितरणच्या प्रवेशद्वारासमोरून उचलणार नसल्याचा पवित्रा घेतला.

या प्रकरणाची सविस्तर हकीकत अशी की, अतीश जयराम लांडे हा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडे कंत्राटी कर्मचारी म्हणून कामास होता.

दि.18 मे रोजी मंगळवेढा शहरातील नागणेवाडी येथे वीज दुरुस्तीचे काम करत असताना अचानक वीजप्रवाह सुरू झाल्याने त्याला विजेचा धक्का बसला व विजेच्या डांबावरून खाली पडला

त्याला तात्काळ उपचारासाठी सोलापूरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्याचा आज दि.21 रोजी मृत्यू झाला.

या घटनेनंतर मंगळवेढ्यातील नातेवाईक व नागरिकांनी महावितरणच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करीत सध्या महावितरणच्या मंगळवेढा शाखा कार्यालयात ठिय्या मांडला असून

पावसाळ्याच्या तोंडावर वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असून महावितरणचे अधिकारी व कर्मचारी मुख्यालयात राहत नसल्यामुळे याच्या देखभाल दुरुस्तीकडे कोण लक्ष देत नाही

परिणामी काही ठिकाणी खाजगी तर काही ठिकाणी कंत्राटी कर्मचाऱ्याकडून काम करून घ्यावे लागत आहे. त्यावेळेला जबाबदार कर्मचारी मुख्यालयात नसल्यामुळे अशा धोकादायक घटनेला सामोरे जावे लागते.

याकडे महावितरणचे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. गत महिन्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नारायण गोवे यांनी देखील या कार्यालयाच्या मनमानी कारभाराबद्दल आंदोलनाचा इशारा दिला होता.

दरम्यान अतीशचा मृतदेह महावितरणच्या मंगळवेढा शाखा कार्यालयासमोर ठेवला असून महावितरणचे जबाबदार कर्मचारी कोणीच उपस्थित नसल्यामुळे नागरिकांत संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

नातेवाईकांनी त्याला न्याय दिल्याशिवाय व संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह उचलणारा नसल्यास इशारा दिला. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी कडेकोट बंदोबस्त लावला होता.

आतिशच्या मृत्यूस कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, शाखा अभियंता, लाईनमन हे जबाबदार असून त्यांच्या निष्काकाळजीपणामुळे त्याचे कुटुंब उघड्यावर पडले असून यामध्ये दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यावर 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.(स्रोत:सकाळ)

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: महावितरण मंगळवेढा

संबंधित बातम्या

मंगळवेढ्याची लेक चीनमध्ये फडकवणार तिरंगा! पण… गरिबी आड येतेय; ‘प्रज्ञा’च्या स्वप्नांना पंख देण्यासाठी पुढे या; दानशूर व्यक्तींना मदतीचे नम्र आवाहन

मंगळवेढ्याची लेक चीनमध्ये फडकवणार तिरंगा! पण… गरिबी आड येतेय; ‘प्रज्ञा’च्या स्वप्नांना पंख देण्यासाठी पुढे या; दानशूर व्यक्तींना मदतीचे नम्र आवाहन

June 8, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

दोन पावले मागे, की मोठ्या झेपची तयारी? समर्थक निराश, जाणकार खूश; प्रशांत परिचारकांच्या शांत भूमिकेमागे दडलंय काय?

June 7, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

मंगळवेढा बस स्थानकावर प्रवास करताय? तर सावधान! गर्दीच्या ठिकाणी स्वतःच्या साहित्याची आणि पैशांची काळजी घ्या; वृद्ध शेतकऱ्याची पुंजी चोरट्याने उडवली

June 6, 2026
मंगळवेढ्यात आर्थिक प्रगतीचा नवा अध्याय! ‘नूतन महिला अर्बन’चा आज दिमाखदार शुभारंभ; महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांची मेजवानी

मंगळवेढ्यात आर्थिक प्रगतीचा नवा अध्याय! ‘नूतन महिला अर्बन’चा आज दिमाखदार शुभारंभ; महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांची मेजवानी

June 6, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

समृद्ध पंचायतराज अभियानात मंगळवेढ्यातील ‘या’ गावची छाप; जिल्हास्तरीय मूल्यमापन समितीकडून विकासकामांची पाहणी

June 5, 2026
खुशखबर! श्रीराम सुपर मार्ट आजपासून मंगळवेढ्यातील ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज; सर्व खरेदी आता एकाच छताखाली; खरेदीवर ग्राहकांना आकर्षक भेटवस्तू

पालकांसाठी आनंदाची बातमी! मंगळवेढ्यातील ‘श्रीराम सुपर मार्ट’मध्ये शालेय साहित्यावर २५% ते ६०% पर्यंत घसघशीत सूट; महागाईला ब्रेक, नव्या शैक्षणिक वर्षाची खरेदी होणार आता बजेटमध्ये

June 3, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

अन्नदाता की गुन्हेगार? जळणाऱ्या पिकांसाठी पाणी मागितलं; प्रशासनाने थेट ‘गुन्हा’ दाखल केला; ​माण नदीकाठच्या १६ गावांतील शेतकऱ्यांचा संताप

June 3, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

खळबळ! कर्नाटक हादरवणारे गोविंदपूर हत्याकांड; सिद्धापूर कनेक्शन’ उघड, पोलिसांकडून एका संशयिताला अटक

June 2, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मदरशात धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली अश्लील चाळे; सोलापूरच्या नराधम मौलानाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पीडितांचा आकडा वाढण्याची भीती

June 2, 2026
Next Post
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

धक्कादायक! केवळ 20 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्यानं संपवलं जीवन; सोयायटी सचिवाचं तलाठ्याला पत्र

ताज्या बातम्या

पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

नागरिकांनो! पहिल्या लग्नाचा खर्च सरकारचा, अनेकांना ही योजना माहीतच नाही; कसा करायचा अर्ज?

June 9, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण..

June 9, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

मोदीजी! सामान्यांनी जगायचं कसं? ​‘अच्छे दिन’ कुठे गेले? महागाईने गाठला उच्चांक; काँग्रेसची महागाई हटवण्यासाठी भाजपला आणले, पण आता जनतेवरच ‘महागाईचा सर्जिकल स्ट्राईक’

June 8, 2026
राज्यात साडे सहा लाख शेतकऱ्यांच्या थेट बांधावर पोहोचवले खते आणि बियाणे : कृषिमंत्री दादाजी भुसे

शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको! मुख्यमंत्र्यांचे आवाहन, ‘या’ तारखेनंतर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

June 8, 2026
मंगळवेढ्याची लेक चीनमध्ये फडकवणार तिरंगा! पण… गरिबी आड येतेय; ‘प्रज्ञा’च्या स्वप्नांना पंख देण्यासाठी पुढे या; दानशूर व्यक्तींना मदतीचे नम्र आवाहन

मंगळवेढ्याची लेक चीनमध्ये फडकवणार तिरंगा! पण… गरिबी आड येतेय; ‘प्रज्ञा’च्या स्वप्नांना पंख देण्यासाठी पुढे या; दानशूर व्यक्तींना मदतीचे नम्र आवाहन

June 8, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

जनगणनेच्या कर्तव्यावर निघालेल्या ‘आदर्श शिक्षका’चा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू; कुटुंबाचा एकमेव आधारस्तंभ हरपला

June 7, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा