टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहराला गेली ५० वर्षे तहान भागविणाऱ्या पाण्याच्या टाकीचे आयुष्यमान संपल्याने संबंधीत ठेकेदाराने कामगारांच्या मदतीने ती टाकी जमीनदोस्त केली असून याच जागेवर पुन्हा ६ लाख लिटर क्षमतेची नव्याने टाकी येत्या वर्षभरात उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
मंगळवेढा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सन १९७२ च्या दुष्काळात शिवाजीनगर येथे ६ लाख लिटर क्षमतेची टाकी उभारली होती. या टाकीचे आयुष्यमान २१ वर्षे असल्याचे सांगण्यात आले.
मात्र प्रत्यक्षात या टाकीला जवळपास ५० वर्षे म्हणजेच अर्धशतक पुर्ण झाले होते. मागील तीन वर्षापुर्वी शासकीय तंत्रनिकेतन स्वेरी कॉलेज पंढरपूर येथील अभियंत्याने या टाकीचे आयुष्यमान संपले असल्याचा आदेश दिला होता.
दरम्यान दि.३ सप्टेंबर रोजी संबंधीत टाकी पाडण्याचा योग जुळून आला. याच जागेवर पुन्हा ६ लाख लिटर क्षमतेची टाकी मंजूर असून हे काम ठेकेदार प्रतिक किल्लेदार यांना मिळाले असून येत्या वर्षभरात युध्द पातळीवर काम पुर्ण करुन जनतेला पाणी उपलब्ध करुन देणार असल्याचे ठेकेदाराने प्रसार माध्यमांना सांगितले.
सध्या शहराला सुस्थितीत उच्च दाबाने पाणी मिळत नसल्यामुळे नागरिक नळाला छोट्या मोटारी लावून दैनंदिन पाणी भरत असल्याचे चित्र आहे. नव्याने उभारण्यात येणारी ६ लाख लिटर क्षमतेची टाकी
तसेच तहसिल कार्यालय परिसरात ६ लाख लिटर क्षमतेची उभारण्यात आलेली टाकी, संभाजीनगर येथील टाकी व साठेनगर येथील अडीच लाख लिटर क्षमतेची टाकी या सर्व हे टाक्या सुस्थितीत चालू झाल्यानंतर शहराला उच्च दाबाने पाणी मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान टाकी जमीनीवर पडल्यानंतर सर्वत्र धुरळ्याचे लोट या परिसरात पसरल्याचे चित्र होते. टाकी पडताच नागरिक घाबरुन पळू लागले. या टाकी पाडकामासाठी वीज वितरण कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी व संबंधीत ठेकेदार प्रतिक किल्लेदार आदींनी परिश्रम घेतले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज