टीम मंगळवेढा टाईम्स ।
पार्टटाइम जॉबचे आमिष दाखवून एका महिलेची फसवणूक केल्याची घटना पुण्यात घडली आहे. याबाबत वडगाव शेरी परिसरात राहणाऱ्या ३१ वर्षीय महिलेने फिर्याद दिली.
तक्रारदार महिलेला अनोळखी क्रमांकावरून ‘पार्टटाइम नोकरी करण्यास इच्छुक आहात का?’ असा मेसेज आला. महिलेने होकार दिला असता वेगवेगळे टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगून त्यांना टेलिग्राम ग्रुपमध्ये सामावून घेतले.
सुरुवातीला काही प्रमाणात मोबदला देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर प्रीपेड टास्क, व्हीआयपी टास्क अशी वेगवेगळी कारणे सांगून तक्रारदार महिलेकडून तब्बल १२ लाख ७५ हजार रुपये उकळले.
काही कालावधीनंतर नफ्याचे पैसे मिळत नसल्याने विचारणा केली असता महिलेला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
महिलांनी ग्रुपमध्ये अॅड केले अन् पावणेसहा लाख गमावल
व्हॉटस्अॅप ग्रुप तयार करीत त्याद्वारे एका योजनेत गुंतवणूक केल्यास अधिकचा नफा देण्याचे आमिष दाखवत कांचनकुमार सुधाकर पिंपळे (४७, रा. भालोद, ता. यावल) या शेतकऱ्याची पाच लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी २ सप्टेंबर रोजी सायबर पोलिस ठाण्यात लक्ष्मी व संजना नामक दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
एप्रिल २०२३ मध्ये लक्ष्मी व संजना नामक दोन महिलांनी एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला व त्यात भालोद येथील शेतकरी कांचनकुमार पिंपळे यांना समाविष्ट केले. त्यावर दोन क्रमांकाद्वारे एक गुंतवणूक योजना सांगून त्यांचा विश्वास संपादन केली.
या योजनेत गुंतवणूक केल्यास अधिकचा नफा देतो, असे त्यांना सांगण्यात आले. त्यासाठी या दोन महिलांनी पिंपळे यांच्या बँक खात्यातून वेळोवेळी एकूण सहा लाख ३० हजार रुपये दोन वेगवेगळ्या बँक खात्यांवर स्वीकारले. मात्र, परतावा दिला नाही.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज