mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

संतापजनक! मंगळवेढ्यातील गणेश मंदिरात पुरातत्व विभागाने केली तोडफोड; भाविकांमध्ये संतापाची लाट

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 3, 2022
in मंगळवेढा, सोलापूर
संतापजनक! मंगळवेढ्यातील गणेश मंदिरात पुरातत्व विभागाने केली तोडफोड; भाविकांमध्ये संतापाची लाट

टीम मंगळवेढा टाईम्स ।

गणपती बाप्पाच्या आगमनाचे आज जगभर स्वागत होत असताना मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील गणेश मंदिर परिसरातील फरशांची तोडफोड केल्याने भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

तोडफोडीनंतर तातडीने या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

माचणूर येथे पाच हजार वर्षापूर्वीचे महादेवाचे अतिशय पुरातन मंदिर असून पुराणकाळातील शुकाचार्य ,वामदेव, स्वामी समर्थांपासून शंकर महाराजांपर्यंत अनेक ज्येष्ठ ऋषीमुनी आणि संतांनी येथे उपासना केल्याचे दाखले पुराणात सापडतात.

सध्या हे मंदिर जीर्ण झाले असून याचा कारभार पुरातत्व विभागाकडे आहे. मात्र अनेकवेळा तक्रारी करून देखील पुरातत्व विभाग याकडे लक्ष देत नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांच्या आहेत.

गणेश मंदिरात तोडफोड झाल्याचा विडीओ:-

https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2022/08/VID-20220831-WA0134.mp4

महादेवाच्या मंदिरात गणेशाचेही पुरातन मंदिर असून येथे मोठ्या प्रमाणात घाण साचत असल्याने एका भाविकाने या ठिकाणी मूर्तीच्या मागे आणि पुढील बाजूस फारशा बसवून घेतल्या होत्या .

यासाठीही पुरातत्व विभागाला आधी अनेकवेळा तक्रारी करूनही पुरातत्व विभागाने दाखल न घेतल्याने एका भाविकाने या फारशा बसवून घेतल्या होत्या.

आज पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी माचणूर मंदिरात येऊन कोणालाही न सांगता थेट गणेश मंदिर परिसरात तोडफोड करण्यास सुरूवात केली.स्थानिक भाविक आणि पुजारी विरोध करू लागताच काम थांबवण्यात आले.

आजच्या दिवशी केल्याने भाविकांच्या संतापाची लाट उसळली आहे. जरी पुरातत्व विभागाच्या नियमाविरोधात ही फारशी लावली असली तरी यामुळे या मंदिराचे आणि गाभाऱ्याचे पावित्र्य जपले जात होते, असे असताना पुरातत्व विभागाने आज गणेश चतुर्थीलाच येथे उत्खनन केल्याने भाविक संतप्त झाले असून ग्रामस्थांनी या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

या ठिकाणी चार वर्षे औरंगजेब याची राजधानी होती. त्याकाळी औरंगजेबाने महादेवाला गोमांसाचा नैवेद्य दाखविण्याचा प्रयत्न केल्यावर या नैवेद्याची फुले झाल्याची आख्यायिका आहे.

यानंतर संपूर्ण राज्यात हिंदूंची धार्मिक मंदिरे तोडणाऱ्या औरंगजेबाने माचणूरच्या मंदिराला दिल्ली दरबारातून बिदागी सुरु केली होती. आजही हैदराबाद संस्थानाकडून या मंदिराला दरवर्षी श्रावणात बिदागी येते.

वास्तविक हे मंदिर पुरातत्व विभागाकडे गेल्यापासून याच्या मजबुतीसाठी या विभागाने काय केले असा सवाल करत यापूर्वी शेकडो वर्षांपासून स्थानिक भाविकांनीच या मंदिराची डागडुजी आणि जोपासना केली असल्याचा दावा ग्रामस्थ करत आहेत.

पुरातत्व विभागाच्या नियमाचा जरी भंग झाला असला तरी किमान तोडफोड करण्यापूर्वी गणेशचतुर्थीला अशी कारवाई करणे कितपत योग्य होते असा सवाल आता ग्रामस्थ आणि भाविक करत आहेत. याबाबत पुरातत्व विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.(स्रोत:ABP माझा)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: गणेश मंदीरमंगळवेढा

संबंधित बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंना नार्वेकरांकडून ‘राजकीय बूस्टर डोस’; आवताडे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण

August 23, 2026
शेतकर्‍यांना एफआरपीनुसार उसाची बिले दिली नाहीत; सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ कारखाने रेड झोनमध्ये

साखरेचा भाव वाढला, मग उसाचा का नाही? शेतकऱ्याच्या घामाला योग्य किंमत मिळावी; प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील यांचा खरमरीत सवाल

August 23, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! सोलापूर जिल्ह्यात कधी पडणार चांगला पाऊस? पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती

August 23, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

विद्यार्थी व प्रवाशांना मोठा दिलासा! मंगळवेढा आगारासाठी ५ नव्या एसटी बसेस दाखल; अनिल सावंत यांच्या पाठपुराव्याला यश; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मागणी मान्य

August 22, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

गावाचे अस्तित्व वाचवण्यासाठी लढा, पण पोलिसांचा 35 ग्रामस्थांवर गुन्हे; मंगळवेढ्यात बायपास आंदोलनावरून ग्रामस्थ आक्रमक; हक्क मागणे हा गुन्हा आहे का?

August 21, 2026
जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

August 20, 2026
हक्काच्या पैशांसाठी वृद्धांची फरफट! ३ दिवस उलटले तरी चेअरमन-संचालक गायब; दामाजी कारखान्याला ‘गेट बंद’चा थेट इशारा; मंगळवेढ्यात संतापाचा भडका

​वर्षानुवर्षांचा वनवास संपणार कधी? थकीत रकमांचा निर्णय होईना; दामाजी कारखान्याचे निवृत्त कर्मचारी आक्रमक; आज कारखान्याला ठोकणार कुलूप?

August 19, 2026
धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

August 19, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

वडिलांवर रुग्णालयात उपचार, डबा घेऊन जाताना मुलावर काळाचा घाला; मंगळवेढा-सोलापूर महामार्गावर अपघात

August 18, 2026
Next Post
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

कौतुकास्पद! मंगळवेढ्याच्या लेकीचा दिलदारपणा; पहिल्या पगारातून दिली पालवी संस्थेस 11 हजारांची देणगी

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंना नार्वेकरांकडून ‘राजकीय बूस्टर डोस’; आवताडे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण

August 23, 2026
शेतकर्‍यांना एफआरपीनुसार उसाची बिले दिली नाहीत; सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ कारखाने रेड झोनमध्ये

साखरेचा भाव वाढला, मग उसाचा का नाही? शेतकऱ्याच्या घामाला योग्य किंमत मिळावी; प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील यांचा खरमरीत सवाल

August 23, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! सोलापूर जिल्ह्यात कधी पडणार चांगला पाऊस? पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती

August 23, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

धक्कादायक! शिक्षिकेने ६ वर्षांच्या विद्यार्थ्याच्या कानशिलात लगावली; पुढच्याच क्षणी चिमुकल्याचा जागीच तडफडून मृत्यू

August 22, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

विद्यार्थी व प्रवाशांना मोठा दिलासा! मंगळवेढा आगारासाठी ५ नव्या एसटी बसेस दाखल; अनिल सावंत यांच्या पाठपुराव्याला यश; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मागणी मान्य

August 22, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

तळणीनंतर खाद्यतेल पुन्हा वापरणारांनो सावधान! खाद्य तेलाबद्दल तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, ‘हा’ नियम न पाळल्यास 7 वर्षापर्यंत शिक्षा; विक्रेत्यांना गंभीर इशारा

August 21, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..