मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
मंगळवेढा तालुक्यातील बोराळे -मंगळवेढा रस्त्यावरुन शेताकडे जाणाऱ्या एका महिलेसह वृद्ध इसमास हेल्मेट घालून तोंड बांधून आलेल्या मोटार सायकलस्वाराने मारहाण करीत,
दमदाटी करुन स्त्रीच्या कानातील जबरदस्तीने ८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे टॉप्स व वृध्दाच्या खिशातील बाराशे रुपये असा एकूण ९ हजार २०० रुपयाचा मुद्देमाल चोरुन नेला असल्याचा प्रकार घडला आहे.
फिर्यादी वैशाली नंदकुमार मुंगसे (रा.बोराळे) यांचे वडिल जगन्नाथ साळुंखे हे सायकलवर शेतात गेले होते. तसेच शेजारी राहणारी सुरेखा गेना गंगधरे या शेतात जात असताना
दुपारी १२ च्या दरम्यान हेल्मेट घालून तोंड बांधून आलेल्या दुचाकीस्वाराने तिला मारहाण करुन दमदाटी करीत तिचे कानातील सोन्याचे ८ हजार रूपये किंमतीचे टॉप्स जबरदस्तीने काढून घेऊन गेला.
तसेच फिर्यादीचे वडिल शेतातून सायकलवर लाकडाची मोळी बांधून घराकडे दुपारी १२.३० वाजता येत असताना दुचाकीस्वार तुमच्या मुलाने तुम्हाला देण्यासाठी पैसे दिले आहेत.
तुमच्याकडे सुट्टे पैसे आहेत का अशी बतावणी केल्यावर फिर्यादीच्या वडिलाने माझा मुलगा मयत झाला असून मला मुलगा नाही तुला पैसे कोणी दिले?
असे म्हणताच त्या दुचाकीस्वाराने दमदाटी करत शर्टाच्या खिशात जबरदस्तीने हात घालून १२०० रुपये काढून घेवून गेला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज