टीम मंगळवेढा टाईम्स।
जिल्ह्यातील दुधाची भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय पथकाने मंगळवारी माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील चार दूध डेअऱ्यांवर छापा टाकला.
दरम्यान, हेरिटेज दूध डेअरीमधील ४० लिटर दुधाला घाणेरडा वास येत असल्याचे आढळून आल्याने ते दूध जागीच नष्ट करण्यात आले.
अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.
त्या समितीत जिल्हा पोलीस अधीक्षक, अन्न औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त, पशुसंवर्धन आयुक्त, दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी, वैध मापनशास्त्र विभागाचे उपनियंत्रक आदींचा समावेश आहे.
जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी निलाक्षी जगताप, सहाय्यक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी विश्वेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली टेंभुर्णी येथील दूध पंढरी, हेरिटेज, अमुल आणि कंट्रीडेलाईट या चार दूध डेअऱ्यांवर छापे टाकण्यात आले.
‘दूध पंढरी’च्या दुधात भेसळ नसल्याचे आढळून आले. अमूल आणि कंट्रीडेलाईट दुधाचे सॅम्पल घेऊन ते पुण्यातील प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठविण्यात आले आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज