टीम मंगळवेढा टाईम्स ।
गैरकायद्याची मंडळी जमवून धारदार शस्त्र व दांडके दाखवून रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना आडवे होऊन धाक दाखवून दहशत पसरविणाऱ्या सात जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून दोन तलवारीसह दांडके जप्त केले.
ही कारवाई मंगळवारी दुपारी ३.३० च्या सुमारास महूद (ता. सांगोला) येथील अकलूज चौकात केली. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल लक्ष्मण वाघमोडे यांनी ७ जणांविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिस हवालदार बापूसाहेब झोळ, विकास क्षीरसागर, राजू चौगुले, पोलिस नाईक केदारनाथ भरमशेट्टी, बाबासाहेब पाटील, पोलिस कॉन्स्टेबल लक्ष्मण वाघमोडे यांना
मंगळवारी दुपारी ३.३०च्या सुमारास गुप्त बातमीदाराने काही इसम महूद येथील अकलूज चौकात मशिदीजवळ हातात तलवार व दांडके दाखवून लोकांना रस्त्यात अडवून धाक दाखवीत असल्याची माहिती मिळाली.
तसेच त्या परिसरातील लोकांनी घर व पकडले. दुकानाचे दरवाजे बंद केले असून रस्त्यावर त्यांची दहशत सुरू असल्याचे माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांनी तेथे धाव घेतली असता
दोन इसम हातात लोखंडी तलवार घेऊन व त्यांच्यासोबत काही इसम हातात दांडके घेऊन लोकांना अडवून धाक दाखवीत होते.
यादरम्यान पोलिसांना पाहून सदर इसम पळून जाण्याच्या बेतात असताना पोलिसांनी घेरावा घालून आकाश ऊर्फ कांचन ऊर्फ कांच्या अनिल बोडरे (वय २२),
विशाल अनिल बोडरे (वय २९), अमित अजय चव्हाण (वय १९), हणमंत भारत येडगे (वय २८), समीर बशीर पठाण (वय ४१), अस्लम बशीर पठाण (वय ३२), फिरोज बशीर पठाण (वय ३३, सर्व रा. महूद) यांना निःशस्त्र करून
आकाश ऊर्फ कांचन बोडरे व असलम पठाण यांनी तलवार जवळ बाळगल्याबाबत त्यास परवाना आहे का? विचारणा केली असता त्याने नसल्याचे सांगितले, पोलिसांनी पंचासमक्ष दोघांकडून तलवार जप्त करून सर्वांना ताब्यात घेऊन अटक केली.
त्यांच्यावर भादंवि विविध कलमांतर्गत तसेच आर्मी अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल केला. तपास पोलिस हवालदार बापूसाहेब झोळ करीत हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज