टीम मंगळवेढा टाईम्स।
जनावरांच्या बाजारातून कत्तलखान्याकडे जाणारी जनावरे, चोरी रोखण्यासाठी पोलिस कर्मचारी पेट्रोलिंग करीत होते.
त्यावेळी पोलिसांना काही जणांची हालचाल संशयित वाटल्याने संशयावरून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी कलेढोण व घरनिकी ता.आटपाडी येथून
शेतकऱ्यांच्या दोन म्हशी चोरून बाजारात विक्रीसाठी आणल्याचे लक्षात येताच पोलिसांनी चौघांना रंगेहात पकडले.
याप्रकरणी अमर चंद्रकांत जाधव, युवराज नारायण बुधावले, अक्षय अशोक बुधावले व अर्जुन माधव मंडले सर्वजण (रा.करगणी, ता.आटपाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या आदेशान्वये सांगोला पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन जगताप,
पोलिस उपनिरीक्षक पोपट काशीद, पोलिस हवालदार संतोष देवकर, पोलिस हेडकॉन्स्टेबल बापूसाहेब झोळ, असलम काझी, पोलिस कॉन्स्टेबल लक्ष्मण वाघमोडे यांनी केली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज