टीम मंगळवेढा टाईम्स ।
मोहोळ येथे केलेल्या तोडफोड प्रकरणी आता मोठी बातमी समोर येत आहे. या प्रकरणी माजी आमदार रमेश कदम आणि ठाकरे गटाचे उपनेते
शरद कोळी यांच्यासह ७२ कार्यकर्त्यांना एक एक महिना कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. यामुळे सोलापूरमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. नेमकं प्रकरण काय होतं, ते पाहू या.
मोहोळ येथील उड्डाण पुलाखालील जाळी तोडणे आणि पोलीस स्टेशनवर मोर्चा काढल्याप्रकरणी माजी आमदार रमेश कदम आणि ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्यासह ७२ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला.
त्याप्रकरणी ही शिक्षा आज सुनावण्यात आली आहे. २०१५ साली मोहोळ शहरातील उड्डाण पुलाखाली छोट्या व्यापाऱ्यांना बसण्यासाठी मज्जाव करत प्रशासनाकडून जाळी मारण्यात आली होती.
मात्र, जेसीबीद्वारे तत्कालीन आमदार रमेश कदम यांनी याविरोधात मोर्चा काढला होता. त्यांनी ही पुलाखालील जाळी तोडली होती. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आता पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत आंदोलन केल्याप्रकरणी माजी आमदार रमेश कदम, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्यासह एकूण ७२ जणांना १ महिना कारावास आणि १ हजाराचा दंड थोठावण्यात आला आहे.
दरम्यान सर्वसामान्य कष्टकरी आणि कामगारांसाठी आम्ही जेलमध्ये गेलो, तरी आम्ही आवाज उठवत राहणार अशी प्रतिक्रिया माजी आमदार रमेश कदम यांनी दिली आहे.
सर्वसामान्यांसाठी आवाज उठवत राहणार अशी भूमिका माजी आमदार रमेश कदम यांनी स्पष्ट केली आहे. यामुळे आता सोलापूर जिल्ह्यातील वातावरण चांगलंच तापलेलं आहे.(स्रोत:साम TV)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज