मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । राज्यात १४० आकड्याने सुरू होणाऱ्या क्रमांकावरून फोन आल्यास घेऊ नका, आर्थिक फसवणूक होईल, अशी सूचना पोलीस वस्त्या-वस्त्यांमध्ये देत आहेत, अशा ध्वनिचित्रफिती शुक्रवारी संध्याकाळी समाजमाध्यमांवरून व्हायरल झाल्या आणि एकच घबराट पसरली. त्यानंतर ही एका वाहिनीवरील मालिकेची जाहीरात असून या अफवेवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन मुंबई पोलिसांनी तातडीने केले. The number 140 in the state has created a stir; What is the truth, Maharashtra Police Cyber Cell revealed!
समाजमाध्यमांवर शुक्रवारी व्हायरल झालेल्या ध्वनीचित्रफितीमध्ये पोलीस वाहनातून फिरताना दिसत असून पोलीस उद्घोषणा करीत आहेत. १४० आकड्यापासून सुरू होणाऱ्या क्रमांकावरचे आलेले फोन उचलल्यास बॅंकतील सर्व रक्कम काढली जाईल, असे या उद्घोषणेत सांगितले जात आहे. एका खासगी टीव्ही वाहिनीने आपल्या नवीन मालिकेच्या प्रमोशनसाठी केलेले हे चित्रीकरण आहे. मात्र तसा कोणताच खुलासा यामध्ये नसल्याने खरेखुरे पोलीसच या सूचना करीत असल्याचे नागरिकांना वाटले आणि मोठा गोंधळ निर्माण झाला.
कोणतेही तथ्य नसून जोपर्यंत आपण, बँक अकाउंट डिटेल्स, ओटीपी अथवा क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड चे पूर्ण नंबर तसेच सी. व्ही. व्ही./ पिन नंबर शेअर करीत नाही तोपर्यंत आपल्या बँक खात्याला कसलेही नुकसान होऊ शकत नाही हे लक्षात घ्यावे. (2/n)
— Maharashtra Cyber (@MahaCyber1) July 11, 2020
डेबिट/ क्रेडिट कार्ड डिटेल्स जर कोणी विचारत असेल तर आपण आपली कोणतीही वैयक्तिक माहिती, बँक खात्याची माहिती, डेबिट/ क्रेडिट कार्डची माहिती अथवा पिन नंबर/ ओटीपी देऊ नये अथवा दिला जाणार नाही याची काळजी घ्यावी.
धन्यवाद
विशेष पोलीस महानिरीक्षक,
महाराष्ट्र सायबर (4/n)
— Maharashtra Cyber (@MahaCyber1) July 11, 2020
नागरिकांनी एकमेकांना समाजमाध्यमांवरून ही ध्वनीचित्रफित पाठवली. मात्र मुंबई पोलीस दलाने ही अफवा असल्याचे काही वेळातच ट्वीटरच्या माध्यमातून स्पष्ट केले. राज्याच्या सायबर विभागानेही तातडीने वाहिनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हा प्रकार लागलीच थांबवण्याची सूचना दिली. या प्रसंगाबाबत सायबर विभाग आपला अहवाल मुंबई पोलिसांना देणार आहे. या प्रकाराबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड संताप असून वाहिनीवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज