मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
मंगळवेढा तालुक्यातील माध्यमिक आश्रमशाळा, पडोळकरवाडी येथील आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या पटनोंदणी व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्याकरीता शासनाकडून सुरू असलेल्या
शालेय पोषण आहारावर शाळेतीलच मुख्याध्यापक राजेंद्र पोतदार यांनीच डल्ला मारला असून शासनाची फसवणूक केल्याची तक्रार शाहू शिक्षण संस्थेच्या सचिवांनी शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शाहू शिक्षण संस्था पंढरपूर संचलित माध्यमिक आश्रमशाळा, पडोळकरवाडी, ता. मंगळवेढा या आश्रमशाळेत इ.५ वी ते १० वीचे वर्ग सुरू असून इ. ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत मोफत शालेय पोषण पूरक आहार दिला जातो.
परंतु सदर शाळेतील पाल्य व पालक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी संस्थेस तोंडी व लेखी स्वरूपात सदरील शालेय पोषण पूरक आहार विद्यार्थ्यांना दिला जात नसलेबाबतची तक्रार संस्थेकडे केली आहे.
सदर प्राप्त तक्रारीवरून संस्थेने कमिटी नेमून चौकशी करून संस्थेस अहवाल सादर करणेविषयी कळविण्यात आले होते. सदर कमिटीने आश्रमशाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र वासुदेव पोतदार यांनी शालेय पोषण पूरक आहारासाठी देण्यात आलेल्या निधीचा अपहार केल्याचे निदर्शनास आले आहे.
याबाबतचा कमिटीचा लेखी स्वरूपाचा अहवाल शिक्षणाधिकारी यांच्या पत्रासोबत जोडण्यात आला आहे. मुख्याध्यापक राजेंद्र वासुदेव पोतदार यांनी केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी देखील केली आहे.
दरम्यान, पालकांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने शाहू शिक्षण संस्थेचे सचिव ढोबळे यांनी एक कमिटी नेमून चौकशी केली आहे. चौकशीमध्ये शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी सदर घटने संदर्भात लेखी स्वरूपात माहिती दिली, संस्थेने मुख्याध्यापकास बडतर्फ करून शासनास कळवले आहे.
ऑडिट मध्ये नोंदी अचूक व योग्य
सदर संस्थेमध्ये अंतर्गत वाद असून शालेय पोषण आहार वितरणामध्ये कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. याबाबत मी सहाय्यक संचालक यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे. याबाबत शासकीय ऑडिट मध्ये नोंदी अचूक व योग्य असून याबाबत तशी नोंद आहे.- राजेंद्र पोतदार
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज