मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
महाअवास अभियानांतर्गत २०२२-२३ मधील सर्वोत्कृष्ट गृहसंकुलमध्ये तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी ग्रामपंचायतीला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज चव्हाण यांच्या हस्ते पुणे येथे कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार गटविकास अधिकारी योगेश कदम, घरकुल विभागाचे विस्तार अधिकारी श्रीनिवास शेरला, सरपंच अनिल पाटील, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गोरे यांनी स्वीकारला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम भरत गोगावले उपस्थित होते.
राज्यभरात प्रतीक्षा यादीतील बेघर लाभार्थ्यांना निवारा उपलब्ध करून देण्यासाठी यंदा महाआवास अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणात घराचे बांधकाम सुरू आहे.
त्या दृष्टिकोनातून मंगळवेढा तालुक्यामध्ये लक्ष्मी दहिवडी येथे मरिआई समाजातील लोकांना एकाच ठिकाणी बारा घरांचे संकुल बांधण्यात आले. त्यामुळे या गावाची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली.
मंगळवेढा तालुक्यामध्ये यंदा ५ हजार १५२ घरकुलाला मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ५ हजार ३८ घरकुल लाभार्थी पात्र झाले. ५ हजार ६३६ लोकांना पहिले हप्त्याचे वितरण करण्यात आले.
सध्या ८५ घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. शासनाच्या मोफत वाळू धोरणानुसार पात्र लाभार्थ्यांची यादी नुकतीच महसूल प्रशासनाला देण्यात आली. त्यामुळे भविष्यात घरकुल बांधकामाला आणखी गती मिळणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज