टीम मंगळवेढा टाईम्स ।
उजनी धरणातून सोलापूरसाठी 6 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने भीमा (चंद्रभागा) नदी दुथडी भरून वाहत आहे.
या पाण्यात विवाहित महिला व (12 वर्षीय) लहान मुलगा बुडाला असल्याची घटना आज (शुक्रवार) दुपारी 12 ते 12.15 वाजण्याच्या दरम्यान चिंचोली भोसे ता. पंढरपूर येथे घडली आहे.
भीमा नदी पात्रात कपडे धुण्यासाठी गेलेली पायल सुग्रीव लोंढे (वय 18) ही विवाहित महिला व तिच्या सोबत जय दत्ता जाधव (वय 12) हे दोघे बुडाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलिस निरीक्षक किरण अवचर हे टीमसह घटनास्थळी पोहोचले.
त्यांनी शोध कार्याला सुरुवात केली असून, भीमा नदीकाठच्या भटुंबरे, शेगाव दुमाला, गोपाळपूर, देगाव, अजनसोड, सुस्ते येथील पोलिस पाटील, सरपंच, ग्रामसेवक यांना बुडालेल्यांचा शोध घेण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक अवचर यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज