मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवेढा तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींमध्ये प्रारूप मतदारयादी गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली. ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयात ती नागरिकांसाठी उपलब्ध असेल.
नागरिकांनी सदर प्रारूप मतदार यादी तपासून त्यावरील लेखी स्वरूपातील हरकत अर्ज दि. २१ ऑगस्टपर्यंत तहसील कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक शाखेमध्ये स्वीकारले जातील.
त्यानंतर त्या सर्व हरकत अर्जांवर चौकशी करून अंतिम मतदार यादी दि. २५ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी प्रारूप मतदार यादीचे अवलोकन करावे, असे आवाहन तहसीलदार मदन जाधव यांनी केले आहे.
तालुक्यातील २८ गावांमध्ये प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध शिरसी, आंधळगाव, खडकी, अकोले, जंगलगी, खुपसंगी, जुनोनी, महमदाबाद हु, बठाण, शेलेवाडी, उचेठाण, बम्हपुरी, उचेठाण, बम्हपुरी, निंबोणी,
जालीहाळ/सिद्धनकेरी, मुंढेवाडी, भाळवणी, चिक्कलगी, नंदुर, हिवरगाव, रड्डे, लक्ष्मी दहिवडी, लोणार, मानेवाडी, पडोळकरवाडी, रेवेवाडी, डिकसळ, लमाणतांडा (पोट निवडणूक) या गावांची यादी प्रसिद्ध झाली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज