मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात व परिसरात आज वातावरणात मोठा बदल झालेला पहायला मिळाला. जून महिना संपत आला तरी राज्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतील पाणी मिळत नव्हते. तर उखाड्यामुळे लोक हैराण झाले होते.
मात्र काल व आज सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा आणि विविध भागात दमदार पावसाची सुरुवात झाली आहे. पावसाने झोडपून काढल्याने उखाड्यामुळे लोक हैराण झालेल्यांना दिलासा मिळालाच त्याचबरोबर पाऊस झाल्याने बळीराजाही सुखावला आहे.
तर पाऊस झाल्याने संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जिल्ह्यात येताचं पावसाला सुरुवात झाल्याचं नागरीक बोलत आहेत.
भारतीय हवामान विभागानं रेंगाळलेला मान्सून २४ जूनपासून सक्रीय होणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार वातावरणातील झालेला बदल यामुळं मान्सूनचा पाऊस बरसण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळं मान्सूनची प्रतीक्षा करणाऱ्या राज्यातील नागरिकांसह शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक गोष्ट आहे. राज्यात आज सकाळपासून मुंबई, ठाणे, चंद्रपूर, अंबरनाथ, कल्याण डोंबिवलीमध्ये पावसानं हजेरी लावली आहे.
काल व आज मंगळवेढामध्ये अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला होता. त्या अंदाजानुसार सोलापूर जिल्हयात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.
एकंदरीतच जिल्ह्याचा पारा ४२ अंश सेल्सिअस वर गेला असताना नागरिकांना उकाडा जाणवत होता. मात्र, पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. भारतीय हवामान विभागानं देखील चंद्रपूरमध्ये मान्सून सक्रीय होईल आणि तिथून तो विदर्भात सक्रीय झाला आहे.
रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यात काल पावसानं हजेरी लावली होती. कोल्हापूरमध्ये राधानगरी तालुक्यात पाऊस बरसला. तर, रत्नागिरी जिल्ह्यात काल रात्री काही ठिकाणी पाऊस पडला होता.
साताऱ्यात आज ढगाळ वातावरण दिसून आलं. भारतीय हवामान विभागानं नाशिकमध्ये सोमवारपासून पाऊस सुरु होईल, असा अंदाज वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागानं मान्सूनसाठी अनुकूल बदल वातावरणात झाल्याचं म्हटलं आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज