मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर येथे सर्व वारकरी बांधवांसाठी मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
दरम्यान, युवासेना तालुका प्रमुख स्वप्निल उर्फ बाळासाहेब निकम यांनी मंगळवेढा परिसरात महाआरोग्य शिबिराची जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.
यावेळी ज्ञानेश्वर मंडळे, संतोष अवताडे, प्रशांत माने, अतिश सोनवले अण्णा वाकरकर आदिजण उपस्थित होते.
आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून आषाढी पालखी सोहळ्यांसोबत आलेले वारकरी व भाविकांच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्यासाठी तीन ठिकाणी सोय करण्यात आली आहे. आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या संकल्पनेवर आधारित
वारी काळात येणाऱ्या सर्व भाविकांची दि.२७ ते २९ जून या काळात आरोग्य तपासणी करण्यात येईल. नदीपात्र, ६५ एकर व पत्राशेड येथे आरोग्य तपासणी होईल. तेथे शामियाने उभारले आहेत.
यासाठी पाच हजार वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर्स यांचे नियोजन केल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी दिली.
नदीपात्र, ६५ एकर, पत्राशेड व ज्या ठिकाणी मठ, धर्मशाळा यांची संख्या जास्त आहे व वारकरी भाविक मोठ्या प्रमाणात थांबतात, अशा ठिकाणी सर्व आरोग्य सुविधा देण्याकरिता तात्पुरते दवाखाने सज्ज ठेवावेत.
ऑक्सिजन, रक्तसाठा, औषधसाठा मुबलक प्रमाणात डॉक्टर्स, नर्स, आशासेविकांची सेवा आरोग्य शिबिरासाठी डॉक्टर्स, नर्स यांच्यासह आशासेविका अशी ५००० जणांची फौज सेवेसाठी असेल. त्यांच्यामार्फत वारकरी व भाविकांना सेवा पुरवली जाईल
तीन मुख्य ठिकाणांसह मठ, धर्मशाळा आदी ठिकाणी आरोग्य सुविधा पुरवण्यात येणार आहेत.
पालखी मार्गावर वेळेत उपचार मिळावेत, यासाठी फिरत्या दवाखान्याचे नियोजन केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज