टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यात लम्पी आजाराने मृत पावलेल्या जनावरांच्या नुकसान भरपाईपोटी पशुपालकांच्या खात्यावर १० लाख ७५ हजार रुपये जमा करण्यात आले. याबाबतची माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ.भास्कर पराडे यांनी दिली.
तालुक्यात लम्पी आजाराने ४४ गावांत १७६ जनावरे दगावली. या नुकसानीपोटी शासनाकडून प्रति गायीस ३० हजार, बैलास २५ हजार, वासरास १६ हजार असे अनुदान प्राप्त झाले असून,
या नुकसानीपोटी प्रथमतः १० लाख ७५ हजार संबंधित पशुपालकांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले.
सध्या लम्पी आजार कमी झाला असून, त्यात प्रगती होत असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे डॉ. ब्रह्मानंद कदम यांनी दिली.
एकूण एक हजार ७०० बाधित असून त्यापैकी १ हजार ५५३ जनावरे ठणठणीत झाली आहेत. उर्वरीत ८७ आजारी जनावरांवर उपचार सुरू असल्याचे श्री. कदम म्हणाले.
मंगळवेढा तालुक्यात १८ सप्टेंबर २०२२ रोजी लम्पी आजाराने प्रवेश केल्यानंतर सुरवातीला केवळ पाच जनावरांचा मृत्यू झाला. त्यानंतर पाच महिन्यांत तो आकडा १७६ वर पोचल्याने पशुपालकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
मारापूर, महमदाबाद शे., नंदूर, भोसे, मानेवाडी, लोणार, मरवडे, पडोळकरवाडी, ढवळस, घरनिकी, मंगळवेढा, माळेवाडी, तळसंगी, कात्राळ, जुनोनी, लक्ष्मीदहिवडी, गणेशवाडी, निंबोणी, सिद्धनकेरी, सलगर बु., लवंगी, शिवणगी, खुपसंगी, पौट, डिकसळ, आंधळगाव,
दामाजीनगर, हुलजंती, कर्जाळ, आसबेवाडी, डोणज, कचरेवाडी, चिक्कलगी, मल्लेवाडी, तामदर्डी, देगाव, नंदेश्वर, गुंजेगाव, रेवेवाडी, हुन्नूर, मुढवी, रड्डे, धर्मगाव, बठाण आदी ४४ गावांमधून १७६ जनावरांचा मृत्यू लम्पी आजाराने झाला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज