टीम मंगळवेढा टाईम्स।
कोलकाता येथे ‘ऑडिनो व्हायरस’ने डोकेदुखी वाढवली आहे. महाराष्ट्रातही शाळकरी मुलांमध्ये हा व्हायरस वाढत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, अजून तरी या व्हायरसचा धोका सोलापूर शहरासोबत जिल्ह्यातील एकाही बालकाला झाला नाही.
मात्र, प्रतिबंधात्मक काळजी घेत सावधगिरीने ऑडिनो व्हायरसला हरवलं जाऊ शकतं, असं वैद्यकीय तज्ज्ञांचं मत आहे.
कोरोनामुळे आधीच संकटातून बाहेर आलेल्या अनेक लोकांना आता नव्या व्हायरसच्या धोक्यामुळे आणखीन भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.
ऑडिनो व्हायरस हा एक विषाणूजन्य आजार आहे. त्यामुळे कोणत्याही संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने संसर्ग पसरू शकतो.
कोरोना व्हायरसप्रमाणेच हा व्हायरस देखील हवेतून म्हणजेच खोकल्याने किंवा शिकण्याने पसरतो, असेही सांगण्यात आले आहे.
‘ऑडिनो व्हायरस’ची लक्षणे काय?
‘ऑडिनो व्हायरसची लक्षणेही कोरोना व्हायरससारखीच असतात. त्यामुळेच हा कोरोनाचा आणखी एक प्रकार आहे का, या संभ्रमात मुलांचे पालकही आहेत. लक्षणेही तीच आहेत जी कोरोनामध्ये दिसतात.
ऑडिनो व्हायरसचा संसर्ग झाल्यास सर्दी किंवा फ्लूसारखी लक्षणे दिसतात. ताप, घसा कोरडा पडणे, एक्यूट ब्रॉकायटिस यासारख्या समस्याही ऑडिनोमुळे होतात.
याची लागण झालेल्या व्यक्तीला निमोनिया, डोळे लाल होणे, जुलाब, उलट्या आणि पोटदुखी यांसारख्या तक्रारीही असतात. तसेच मूत्राशयाच्या संसर्गाचा धोकाही असतो.
काय आहे ऑडिनो व्हायरस?
कोरोना व्हायरसचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. शास्त्रज्ञ आणि डॉक्टरही कोरोना हवेत असल्याचे सांगत आहेत. जर कोरोनाचे कोणतेही म्युटेशन घातक ठरले तर ते पुन्हा मृत्यूचे कारण बनू शकतात.
■ कोविड व्यतिरिक्त इतर व्हायरसचा धोकाही कायम आहे. ऑडिनो व्हायरस तसाच आहे.
काळजी काय घ्याल?
बाहेरून किंवा शाळेतून आल्यानंतर कमीत कमी २० सेकंदापर्यंत साबणाने हात धुवावेत.
हातांनी वारंवार डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा. ■ जर कोणी आजारी असेल तर त्याच्या संपर्कात येऊ नका.
आजारी असताना घरीच राहा, घराबाहेर पड्डू नका, खोकताना किंवा शिकताना टिश्यू आणि मास्क वापरा.
■ आरोग्याबाबत काही तक्रार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
घाबरू नका… डॉक्टरांशी संपर्क साधा…
■ ऑडिनो व्हायरससाठी कोणतेही विशिष्ट औषध किंवा उपचार नाही. बऱ्याच वेळा, ऑडिनो व्हायरस संसर्गामध्ये सौम्य लक्षणे असतात आणि
वेदना किंवा ताप यावर औषधाने बरे केले जाऊ शकते.
घाबरू नका, अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज