टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील बोराळे ते कागष्ट रस्ता सुधारणा या विकासात्मक बाबीसाठी १० कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.
सदर रस्त्याची गेली अनेक वर्षे सुधारणा अथवा मजबुतीकरण न झाल्याने या रस्त्याच्या पृष्ठभागी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याची बाब निदर्शनास येताचा
आमदार आवताडे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रविंद्र चव्हाण यांच्याकडे पत्राद्वारे या रस्त्याच्या सुधारणेसाठी आवश्यक निधीची मागणी केली होती.
आ.आवताडे यांच्या मागणी दखल घेऊन व या भागातील जनतेची दळणवळण गैरसोय थांबवण्यासाठी मंत्री महोदय यांनी या निधीची तरतूद केली आहे.
गाव -गाड्यातील जनतेच्या मूलभूत व पायाभूत विकासासाठी आ.आवताडे यांनी आतापर्यंत मतदारसंघामध्ये रस्ते, पाणी, आरोग्य आदी बाबींवर कार्य करत असताना निरनिराळ्या योजना अंतर्गत भरीव निधीची उभारणी करून मतदारसंघातील अनेक प्रश्नांना मार्गी लावण्याचे कार्य केले आहे.
गेल्या तीन ते साडेतीन महिन्यापूर्वी राज्याच्या सत्ता सारीपाटावर बदल होऊन मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री पदी ना. देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागली आहे.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे सतत संपर्क ठेवून आ.आवताडे यांनी आपल्या विधानसभा कार्यक्षेत्रातील विविध विकासकामांना प्रभावीपणे गतिमान केले आहे.
निधी मंजूर झालेल्या या रस्त्यावर तालुक्याच्या विविध भागातील लोकांचा शेती, छोटे – मोठे व्यापार, दुग्ध व्यवसाय, शाळा आदी माध्यमातून नेहमीच वावर असतो.
गेली अनेक वर्षे बोराळे ते कागष्ट या रस्ता मजबुती होण्यासाठी या भागातील जनतेने पाठपुरावा केला होता परंतु अद्यापही ती रस्ता सुधारणेची मागणी कागदावरच राहिल्याने हा रस्ता होतो की नाही? असा सवाल उभा ठाकला असता आ.आवताडे यांनी आपल्या दूरदृष्टी नेतृत्वाचा वरचष्मा दाखवून या रस्त्यासाठी निधी उपलब्ध केला त्याबद्दल या भागातील जनतेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पंढरपूर व मंगळवेढा विधानसभा कार्यक्षेत्रातील भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आ.आवताडे यांची व्यापक कार्यशैली या रस्त्याच्या निधी उपलब्धतेमुळे आणखी मजबूत आणि विश्वसनीय झाल्याची भावना जनतेमध्ये उत्त्पन्न झाली आहे. – प्रदीप खांडेकर ( माजी सभापती)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज