मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
शाळा व परिसरात तंबाखू, मावा, सिगारेट, विडीसारखे तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यास बंदी आहे. शिक्षकांनी तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
तीन वेळेस असा प्रकार केल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. असा आदेश सीईओ दिलीप स्वामी यांनी दिला आहे.
जिल्हा परिषद शाळेतील बरेचशिक्षक शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केलेल्या आहेत. त्यामुळे केंद्रप्रमुखांना परिपत्रक काढून सक्त आदेश दिले आहेत.
आदेशाचे पालन न केल्यास २०० रुपये दंड करण्यात येईल. दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार हे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी यांना दिले आहेत.
शिक्षक शाळेच्या वेळेत मोबाइलवर सतत बोलत असल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या होत्या त्यामुळे वर्गात शिकवत असतान वैयक्तिक वापरासाठी बोलण्यासाठी मोबाइल वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यापुढे मोबाइलचा वापर फक्त शैक्षणिक कारणासाठी करता येणार आहे.
…तर ‘त्या’ दिवसाचे वेतन नाही
■ जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी संबंधित शाळा मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांची लेखी परवानगीशिवाय व अत्यावश्यक कामाशिवाय विनाकारण विनापरवानगी वरिष्ठ कार्यालयात न येण्याचे आदेश दिले आहेत.
विनाकारण कार्यालयात आल्यास अशा शिक्षकांना त्या दिवसासाठी विनावेतन करून शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज