मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे शेअर मार्केटमध्ये दहा महिन्यांमध्ये रक्कम दामदुप्पट करून देण्याच्या आमिषाने तब्बल एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सात जणांवर आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
याबाबत रामजी चंद्रकांत होनमाने (वय ३०, रा. मंगळवेढा, जि. सोलापूर, सध्या रा.आटपाडी) यांनी तक्रार दिली आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये आटपाडी येथील निहारिका फायनान्शिअल सर्व्हिसेस या कंपनीचा संचालक संतोष रामचंद्र अडसूळ, त्याचा भाऊ जिल्हा सांख्यिकी अधिकारी सुधीर रामचंद्र अडसूळ, राहुल अशोक अडसूळ, विनायक शंकर माळी, निकिता संतोष अडसूळ, अनिल आनंदा अडसूळ, मल्हारी संजय अडसूळ (सर्व रा. आटपाडी) यांचा समावेश आहे.
आटपाडी येथील निहारिका अशी एकूण ९४ लाख ५९ हजार ५७० फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या कार्यालयामध्ये १९ मे २०२१ ते ३ डिसेंबर २०२१ या कालावधीत संतोष अडसूळ, राहुल अडसूळ, विनायक माळी, सुधीर अडसूळ, निकिता अडसूळ, अनिल अडसूळ, मल्हारी अडसूळ यांनी
वरील आरोपींनी दहा महिन्यांमध्ये दुप्पट परताव्याच्या आमिषाने रामजी होनमाने यांच्याकडून वेळोवेळी ७७ लाख ६८ हजार ९०० रुपयांची गुंतवणूक करून घेतली.
सुरुवातीस १५ लाख ४० हजार रुपयांचा परतावा देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. यानंतर उर्वरित ६२ लाख १८ हजार ९०० रुपये व त्यावरील परतावा देण्यास टाळाटाळ सुरू केली. वारंवार पाठपुरावा करूनही पैसे मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे होनमाने यांच्या लक्षात आले.
याचबरोबर संतोष गुजले यांची १८ लाख ९० हजार, प्रवीण बनसोडे यांची ८ लाख ५० हजार ६७०, तर यशवंत मेटकरे यांची ५ लाख रुपये रुपयांची फसवणूक झाली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज