टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोल्हापूर परिक्षेत्राचे डॉ मनोजकुमार लोहिया यांची बदली पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात सहआयुक्तपदी झाली आहे.
राज्य सरकारकडून बदलीमध्ये काही बदल करून नव्याने यादी जाहीर केल्यानंतर सुनिल फुलारी यांची कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.
दरम्यान, यापूर्वी फुलारी यांची 5 दिवसांपूर्वी काढण्यात आलेल्या आदेशामध्ये नाशिक पोलिस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली होती.
सुधारित यादीमध्ये कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून फुलारी यांची नियुक्त करण्यात आले. फुलारी हे कडक शिस्तीचे समजले जातात. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात नक्षलग्रस्त भागातून केली. त्यांनी नक्षलविरोधी कारवायांत सहभाग घेतला होता.
यापूर्वी फुलारी यांनी सांगली, नागपूर, मुंबई, नाशिक आदी ठिकाणी सेवा बजावली आहे. त्यांच्याच प्रयत्नातून राज्यातील पहिली सायबर क्राईम प्रयोगशाळा सुरू झाली होती.
कोल्हापूर परिक्षेत्रातील 8 पोलिस निरीक्षकांच्या बदली
कोल्हापूर परिक्षेत्रातील 8 पोलिस निरीक्षकांच्या बदली करण्यात आली आहे. मावळते विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी मंगळवारी बदली आदेश काढले होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील तीन पोलिस निरीक्षकांना मे 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयातील पोलिस निरीक्षक शशीराज पाटोळे यांच्यासह जयसिंह रिसवडकर यांना मुदतवाढ देण्यात आलील.
कोल्हापूर शहरातील शाहूपुरी आणि गारगोटीमधील पोलिस निरीक्षक संजय मोरे आणि श्रीप्रसाद यादव यांची सांगलीत बदली झाली आहे. अनिल तनपुरे यांची सांगलीतून कोल्हापुरात बदली झाली आहे.
सोलापूर ग्रामीणचे भगवान खारतोडे यांची पुणे ग्रामीणला बदली करण्यात आली आहे. विनोद घुगे यांची पुणे ग्रामीणमधून सोलापूर ग्रामीणला बदली झाली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज