
मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । अहमदनगर जिल्हा्यामध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. मुलाने फास लावल्यानंतर मुलाच्या वडीलांनी देखील स्वत:ला गळफास लावून घेतल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. Suicide by strangulation of father after death of child In the vicinity of Sanjivani Sugar Factory near Kopargaon city
कोपरगाव शहराजवळील संजिवनी साखर कारखाना परीसरात हि धक्कादायक घटना घडली आहे. 3 जुलैच्या मध्यरात्री राहुल संजय फडे या तरूणाने आपल्या घरातच गळफास लावून घेतला आणि आपल जीवन संपवल. पोटच्या पोराने जीव दिल्याचा धक्का वडीलांना सहन झाला नाही व त्यांनी पण स्वत:ला गळफास लावून घेतल्याने त्यांच्या कुटुंबीयांना दुहेरी संकटाला सामोर जाव लागत आहे.
कोपरगावातील शिंगणापूर हद्दीतील संजीवनी कारखाना पेट्रोल पंपासमोर ही घटना घडली.मुलगा राहुल हा एका शैक्षणिक संस्थेत लॅब असिस्टंट म्हणून नोकरी करत होता. त्याचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्याला एक दीड वर्षाचा मुलगाही आहे.
दरम्यान पोलिसांना आत्महत्यची नेमकी कारण माहीत नसल्याने तुर्तास आकस्मात निधन अशी नोंद कोपरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












