टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढ्यात एकाने दारुच्या नशेत पेटवून घेतले. यात भाजून तो जखमी झाला. रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.
दामाजी किसन जगदाळे (वय ३५, रा. नागणे गल्ली, मंगळवेढा) असे त्याचे नाव आहे. दामाजी याने राहत्या घरासमोर दारुच्या नशेत पेटवून घेतले.
यात भाजून जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी येथील शासकीय रुग्णलयात दाखल केले आहे. याची सिव्हिल पोलिस चौकीत नोंद झाली आहे.
दुचाकीवरून पडल्याने महिला जखमी
दुचाकीवरुन पडल्याने एक महिला जखमी झाली. सोमवारी दि. २५ रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास जुनोनी (ता. मंगळवेढा) नजीक हा अपघात घडला.
सविता सुभाष कांबळे (वय ३८, रा. जुनोनी) असे जखमी महिलेचे नाव आहे. सविता या जुनोनीतून दुचाकीवर मागे बसून डोंगरगावकडे निघाल्या होत्या.
जुनोनीनजीक दुचाकीवरुन खाली पडल्याने डोक्यास मार लागून जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज