टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटात फेक मेसेजेसना (Fake Messages) उधाण आलं आहे. दरदिवशी दिशाभूल करणारी नवी माहिती सोशल मीडियावर पाहायला मिळते. असाच एक व्हॉट्सअॅप मेसेज (Whatsapp Message) मोठ्या प्रमाणावर फॉरवर्ड केला जात आहे. या मेसेजमध्ये वाफ घेतल्याने कोरोना व्हायरस मरतो. त्यामुळे 7 ते 14 ऑगस्ट दरम्यान ‘वाफ प्रक्रीया’ सुरु करा. केवळ 5 मिनिटं वाफ घेतल्याने आठवड्याभरात कोरोना विषाणू नष्ट होईल. असा दावा करण्यात आला आहे. तसंच हा संदेश तुमच्या सर्व ग्रुप्स, नातेवाईक, फ्रेंड्स आणि शेजाऱ्यांना पाठवा. त्यामुळे आपण सर्व एकत्रितपणे कोरोना व्हायरसवर मात करु आणि या सुंदर जगात मुक्तपणे फिरु शकू, असंही सांगण्यात आलं आहे.
विशेष म्हणजे ही माहिती डॉक्टरांनी दिली आहे, असे या मेसेजमध्ये म्हटले आहे.दरम्यान अशी कोणत्याही प्रकारची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आलेली नाही. तसंच वाफ घेतल्याने कोरोना विषाणू नष्ट होतो, या माहितीला कोणताही वैद्यकीय आधार नाही. त्यामुळे हा मेसेज पूर्णतः चुकीचा आणि दिशाभूल करणारा आहे.
त्यामुळे व्हॉट्सअॅपवर फिरत असलेल्या या मेसेजकडे दुर्लक्ष करा आणि फॉरवर्ड करणे टाळा. (ऑक्सिजन लेव्हल तपासण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरुन अॅप डाऊनलोड करा अशा मेसेजद्वारे लोकांची फसवणूक; जाणून घ्या व्हायरल पोस्ट मागील सत्य
गरम पानी वायरस से बचाता है या नहीं?@PrakashJavdekar @PIB_India @shashidigital
#IndiaFightsCorona #कोविड19 pic.twitter.com/dLNg7IPERZ
— आकाशवाणी समाचार (@AIRNewsHindi) August 9, 2020
व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड होणारा मेसेज:
विश्व स्टीम सप्ताह
डॉक्टरों के अनुसार, अगर COVID-19 को नाक से भाप के जरिए मारा जाता है, तो कोरोना को खत्म किया जा सकता है। अगर सभी ने भाप अभियान शुरू किया।
उपरोक्त दिशा में काम करने के लिए, हम दुनिया भर के लोगों से आग्रह करते हैं कि वे 07अगस्त से14अगस्त तक एक सप्ताह के* लिए * भाप प्रक्रिया * शुरू करें, अर्थात् सुबह, दोपहर और शाम।
भाप लेने के लिए सिर्फ 05 मिनट।
एक हफ्ते के लिए इस अभ्यास को अपनाने से हमें यकीन है कि घातक COVID-19 को मिटा दिया जाएगा
कृपया इस संदेश को अपने सभी समूहों, रिश्तेदारों, दोस्तों और पड़ोसियों को भेजें ताकि हम सभी इस कोरोना वायरस को एक साथ मार सकें और इस खूबसूरत दुनिया में स्वतंत्र रूप से एचवी चल सकें।
धन्यवाद
प्रत्येक समूह को भेजे जाने का अनुरोध.
डॉक्टरांनी दिलेली माहिती:
गरम पाणी किंवा पेय घेतल्याने कोरोनाचा संसर्ग होत नाही ही माहिती चुकीची आहे. व्हायरस 45-70 डिग्री वर मरतो असे मानले जाते. इतकं गरम पेय किंवा पदार्थ आपण सेवन करु शकत नाही. तसंच गरम पाणी प्यायल्याने किंवा वाफ घेतल्याने सर्दी-खोकला बरा होऊ शकतो. तसंच घसा खवखवत असल्यास गरम पाणी प्यायल्याने फायदा होऊ शकतो. असे नवी दिल्लीच्या आरएमएलचे डॉक्टर ए. के. वार्ष्णय यांनी सांगितले आहे.
यापूर्वी अशा प्रकारचे अनेक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र कोणत्याही मेसेज, माहितीची सत्यता तपासल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नका किंवा पुढे पाठवू नका, असे आवाहन पोलिसांसह प्रशासनाकडून अनेकदा होत असते. त्यामुळे अशा प्रकारचे मेसेज फॉरवर्ड करणे टाळा.
Steaming for just 5 minutes destroys the corona virus in a week? What is the truth, know
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज